BJP Pune City President Jagdish Mulik Found Corona Positive | Sarkarnama

पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना कोरोना

महेश जगताप
रविवार, 6 सप्टेंबर 2020

दोन दिवसापूर्वी एक मित्र पॉझिटिव्ह आल्याने मुळीक यांनी स्वतःची  कोरोना टेस्ट केली होती व त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्यांनी रुबी हॉस्पिटल मध्ये सिटी स्कॅन व इतर टेस्ट करून घेतल्या. या टेस्ट नॉर्मल आल्याने  मुळीक होम क्वारंटाईन झाले आहे.

पुणे : कोरोनाच्या विषाणूने अनेक राजकीय नेत्यांना गाठले असतानाच काल भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनाही याची लागण झाली. याची माहिती त्यांनी सोशल माध्यमाद्वारे भावनिक पोस्ट टाकून दिली. मी घाबरलेलो नाही, फक्त तुमच्या पासून पंधरा दिवस दूर राहावे लागत आहे याचेच वाईट वाटते असे म्हणत  नागरिकांनी काळजी घेण्याचे अवाहन मुळीक यांनी केले आहे.

दोन दिवसापूर्वी एक मित्र पॉझिटिव्ह आल्याने मुळीक यांनी स्वतःची  कोरोना टेस्ट केली होती व त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्यांनी रुबी हॉस्पिटल मध्ये सिटी स्कॅन व इतर टेस्ट करून घेतल्या. या टेस्ट नॉर्मल आल्याने  मुळीक होम क्वारंटाईन झाले आहे.

''गेली सहा महिने शहराध्यक्ष असल्याने लोकांच्या मदतीला  मला वेगवेगळ्या भागात जावे लागत होते. यामध्ये अनेक लोकांचा संपर्क येत होता. तरीही मी सहा महिने कोरोनाला चकवा देत होतो. पण काल माझ्या शरीरात कोरोनाने शिरकाव केलाच,'' अशी माहिती मुळीक यांनी सोशल माध्यमाद्वारे पुणेकरांना दिली आहे.

''मी सर्व काळजी घेत होतो तरीही मला कोरोना झाला. त्यामुळे पुणेकरांना आवाहन करताना कृपया तुम्ही जास्त काळजी घ्या. विनाकारण गर्दीत जाणं टाळा. जावं लागलंच तर मास्क वापरा. फिजिकल डिस्टन्सिंग पाळा. हात स्वच्छ ठेवा, घरातल्या ज्येष्ठांची, चिमुकल्यांची काळजी घ्या,'' अशी विनंती मुळीक यांनी केली आहे. त्याचबरोबर यामधून मी लवकरच बाहेर पडणार आहे, असा आत्मविश्वासही मुळीक यांनी व्यक्त केला आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख