बँकांकडून त्रास दिला जातोय? सिद्धार्थ शिरोळे काय सांगताहेत ते पहा.... - BJP MLA Siddharth Shirole fighting against Bank Recovery Agents | Politics Marathi News - Sarkarnama

बँकांकडून त्रास दिला जातोय? सिद्धार्थ शिरोळे काय सांगताहेत ते पहा....

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

कोरोनाच्या काळातल्या लाॅकडाऊन नंतर अनलाॅकचा काळ आल्यानंतर काही बँका कर्जवसुलीसाठी ग्राहकांकडे तगादा लावू लागल्या आहेत. काही वेळा ग्राहकांच्या घरी जाऊन दमदाटी करणे किंवा रिकव्हरी एजंटच्या मार्फत फोनवरुन शिवीगाळ करणे असेही प्रकार घडू लागले आहेत. त्यासाठी पुण्याचे शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी अशा ग्राहकांच्या मदतीला धावून जाण्याचे ठरवले आहे

पुणे : कोरोनाच्या काळातल्या लाॅकडाऊन नंतर अनलाॅकचा काळ आल्यानंतर काही बँका कर्जवसुलीसाठी ग्राहकांकडे तगादा लावू लागल्या आहेत. काही वेळा ग्राहकांच्या घरी जाऊन दमदाटी करणे किंवा रिकव्हरी एजंटच्या मार्फत फोनवरुन शिवीगाळ करणे असेही प्रकार घडू लागले आहेत. त्यासाठी पुण्याचे शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी अशा ग्राहकांच्या मदतीला धावून जाण्याचे ठरवले आहे.

याबाबत तक्रारी मिळाल्यानंतर आपण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी पत्रव्यवहार केल्याची माहिती शिरोळे यांनी सोशल मिडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली असून जिल्हाधिकारी नियमपालनाबाबतचे परिपत्रक काढणार असल्याचेही शिरोळे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

याबाबत शिरोळे यांनी बँक ग्राहकांना काही सूचना केल्या आहेत....
त्यात ते म्हणतात..
..

- बँकेतून कुणाचाही फोन आला तर तुम्ही Debt Recovery Agent आहेस का आणि असलात तर त्याचे प्रमाणपत्र आहे का, हा प्रश्न जरूर विचारा. कारण तसा रिझर्व बँकेचा नियम आहे व तसे प्रमाणपत्र असल्याशिवाय तो तुम्हाला फोनच करु शकत नाही

- जर तुमचे खाते एनपीए  असेल, म्हणजे मोरेटोरियमचा काळ सोडून तुमचे तीन महिन्यांचे  हप्ते थकलेले असतील तसे असेल तरच बँकेचा प्रतिनिधी तुमच्या घरी येऊ शकतो. खाते एनपीए नसेल तर काहीही काळजी करण्याची गरज नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत की ३१ आॅगस्ट पर्यंत जी खाती एनपीए नव्हती त्यांना पुढील नोटीसपर्यंत एनपीए खाती म्हणून जाहीर केली जाणार नाहीत.

- त्यातूनही त्रास दिला गेला तर पीएम पोर्टलला तक्रार करा किंवा बँकेने नेमलेल्या लोकायुक्तांकडे तक्रार करा

- फारच त्रास होत असेल तर मानवाधिकार आयोग आणि सायबर क्राईमकडेही तुम्ही तक्रार करु शकता
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख