आंबेठाण :सावरदरी(ता.खेड) येथे मनसेच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या अमित ठाकरे यांचा एक वेगळा अंदाज ग्रामस्थांना अनुभवायला मिळाला. कार्यक्रम स्थळी जाण्याअगोदर ज्या ठिकाणी त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तेथून त्यांनी बैलगाडीत बसून प्रवास केला.
जवळपास तीनशे ते चारशे मीटर अंतर त्यांनी बैलगाडीचे सारथ्य केले. विशेष म्हणजे स्वतः त्यांनी हातात कासरा (जनावरांची दोरी)पकडून बैलगाडी हाकली. यावेळी त्यांनी डोक्यावर भगवान टोपी घातली होती, तर डोळ्यावर काळा गॉगल होत. त्यांचा हा एक हटके अंदाज नागरिकांना अनुभवायला मिळाला.
यावेळी त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर झालेल्या कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र वागस्कर,मनोज चव्हाण,जिल्हाध्यक्ष समीर थिगळे,अझर शेख,तालुकाध्यक्ष संदीप पवार,मंगेश सावंत,सचिन चिखले,मनोज खराबी,भरत तरस,संदीप मेंगळे,मीरा कदम,नीता शेटे,ताराबाई शेटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संदीप पवार यांनी केले.
Edited By - Amit Golwalkar

