यिन अधिवेशनाला दिमाखात सुरवात; सभापतीपदी आकाश शिंदे - YIN convention begin with enthusiasm; Maharashtra Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

यिन अधिवेशनाला दिमाखात सुरवात; सभापतीपदी आकाश शिंदे

संपत देवगिरे
शुक्रवार, 30 जुलै 2021

'सकाळ माध्यम समूहा'च्‍या यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क (यिन) च्‍या अधिवेशनाला आज येथे दिमाखात सुरवात झाली. राज्‍यभरातून आलेल्‍या शॅडो कॅबिनेटच्‍या मंत्री, पालकमंत्री यांच्‍यात उत्‍साह बघायला मिळत आहे.
 

नाशिक : 'सकाळ माध्यम समूहा'च्‍या यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क (यिन) च्‍या अधिवेशनाला आज येथे दिमाखात सुरवात झाली. (YIN convention begin  here with enthusiasm) राज्‍यभरातून आलेल्‍या शॅडो कॅबिनेटच्‍या मंत्री, पालकमंत्री यांच्‍यात उत्‍साह बघायला मिळत आहे. (all over state Shadow cabinet members participated) अधिवेशनाची सुरवात करतांना आकाश शिंदे (Akash Shinde elected as Chairmen) यांची अधिवेशनाच्‍या सभापतीपदी तर वर्षा लोंढे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे.

'यिन'चे तीन दिवसीय अधिवेशन नाशिकच्‍या यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठात होत आहे. या अधिवेशनानिमित्त राज्‍यभरातील प्रतिनिधी काल (ता.२९) नाशिकला दाखल झाले. मुक्‍त विद्यापीठाच्‍या यश-इन सभागृहात शुक्रवार (ता.३०) सकाळपासून ऊर्जात्‍मक वातावरण बघायला मिळाले.

अधिवेशनाचे नियम व अन्‍य सूचना दिल्‍यानंतर सभापती व उपसभापतीपदाची निवड करण्यात आली. यावेळी आकाश शिंदे यांची अधिवेशनाच्‍या सभापतीपदी बहुमताने निवड करण्यात आली. तर उपसभापती पदासाठी वर्षा लोंढे यांचीही बहुमताने निवड करण्यात आली.

यानंतर कामकाज पुढे चालवितांना, सर्वप्रथम 'यिन' शॅडो कॅबिनेटचे मुख्यमंत्री अजय खांडबहाले यांनी सभागृहाला संबोधित केले. आगामी तीन दिवस कामकाजाची दिशा विशद करतांना विविध मुद्यांवर त्‍यांनी मनोगतातून सभागृहाचे लक्ष वेधले. कोरोना काळात राज्‍यभरातील ३६ जिल्‍ह्‍यातील स्‍वयंसेवकांना घेऊन राबविलेल्‍या उपक्रमाचा लेखाजोखा यावेळी सादर करण्यात आला.

बाक वाजवत दिला प्रतिसाद
अगदी विधानसभेच्‍या सभागृहाप्रमाणे 'यिन' अधिवेशनात कामकाज सुरु झाले आहे. मान्‍यवरांच्‍या मनोगतावेळी बाक वाजवत शिस्‍तप्रियतेचे दर्शन सहभागी प्रतिनिधींनी घडविले.
...

हेही वाचा...

कोरोनामुळे पालक गमावलेल्या २४ बालकांना आर्थिक मदत

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख