M.P. Supriya sule talk to kota studant on Vedio call | Sarkarnama

सुप्रिया सुळेंचा कोटातील विद्यार्थ्यांशी संवाद, "तुम्हाला अडचण तर नाही ना?'

Sampat Devgire
शनिवार, 2 मे 2020

लॉकडाऊनमुळे कोटा (राजस्थान) येथे अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी काल आपल्या घरी पोहोचले. खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी या विद्यार्थ्यांशी व्हीडीओ कॉलद्वारे संपर्क करुन त्यांना धीर देत, "काही अडचणी तर नाही ना? असल्यास संपर्क साधा,` असेही सांगितले. 
 

नाशिक : लॉकडाऊनमुळे कोटा (राजस्थान) येथे अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी काल आपल्या घरी पोहोचले. या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या घरी पोहोचता यावे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी या विद्यार्थ्यांशी व्हीडीओ कॉलद्वारे संपर्क करुन त्यांना धीर देत, "काही अडचणी तर नाही ना?. असल्यास संपर्क साधा' असेही सांगितले. 

कोरोना संसर्गामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने कोटा (राजस्थान) येथे महाराष्ट्रातील विविध विद्यार्थी अडकुन पडले होते. त्यांना घरी परतण्याची कोणतिही सोय नव्हती. प्रशासनाची परवानगी देखील नव्हती. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात राजस्थान सरकारशी संपर्क केला. संबंधितांशी चर्चा केल्यानंतर या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परतण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पाठविण्यात आल्या होत्या. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा आणि युवती आघाडीच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी याबाबत पुढाकार घेत हे प्रयत्न फलद्रुप केले. हे दोन्ही नेते आपल्या समर्थकांसह कोटा येथे गेले होते. त्यांनी या विद्यार्थ्यांना सहाय्य केले. त्यांच्या अडचणी सोडविल्या. 

यावेळी राष्ट्रवादीच्या पादधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचा खासदार सुप्रिया सुळे आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याशी व्हीडीओ कॉलद्वारे संपर्क केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांना, "आता तुम्हाला काही अडचणी तर नाहीत ना?. समाधानी आहात ना?. तुमचा प्रवासा सुरु करण्याआधी आपल्या आईबाबांना जरुर कळवा. तुम्ही सुरक्षीत घरी पोहोचाल. त्याबाबत सोशल डिस्टन्सींग पाळा, कोरोना विषयी जागरुक राहून इतरांनाही सहकार्य करा. काही अडचणी वा मदत लागल्यास जरुर संपर्क करा' असे सांगीतले. या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले. अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. "सुखरुप घरी पोहोचा. कोरानाची स्थिती निवळल्यावर आणि सर्व काही पुर्वत झाल्यावर अभ्यासासाठी पुन्हा येऊ असे आपल्या प्राध्यापकांना जरुर सांगा. अडचण आल्यास मला थेट संपर्क करा. निश्‍चिंत रहा.' 

यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पावर यांनी संबंधीतांशी संपर्क करुन या विद्यार्थ्यांना घरी परतण्यासाठी प्रशासनातील संबंधीत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या होत्या. कोटाचे जिल्हाधिकारी तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख