नांदगावकर, सरदेसाई राज ठाकरेंना चुकीची माहिती देतात?

बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई व अविनाश अभ्यंकर यांना वाटले आपल्याला स्पर्धक तयार होतो आहे. त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कान भरले. मला पक्षातून बाहेर पडण्यास भाग पाडले,
Vasant Gite
Vasant Gite

नाशिक : खुप कष्ट करुन नाशिकमध्ये `मनसे` उभी केली. महापालिकेत सत्ता आणली. तेव्हा बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई व अविनाश अभ्यंकर यांना वाटले आपल्याला स्पर्धक तयार होतो आहे. त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कान भरले. मला पक्षातून बाहेर पडण्यास भाग पाडले, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार वसंत गिते यांनी केला आहे.    

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते शिवसेनेत जाणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी गिते यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत स्वगृही मनसे पक्षात परतण्याचे  आवाहन केले. यावेळी श्री. गिते यांनी मनसेच्या नेत्यांना स्पष्ट शब्दात नकार देत सुनावले. 

ते म्हणाले, नाशिक शहरात पक्षाला चांगले दिवस आणल्यानंतर भविष्यात स्पर्धक निर्माण होईल, अशी भीती या नेत्यांत निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी राज ठाकरे यांना चुकीची माहिती दिली. मला पक्षातून जाण्यास ज्यांनी भाग पाडले, त्या बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई व अविनाश अभ्यंकर यांच्याबरोबर पुन्हा काम करावे का? तसे शक्य तरी आहे का? असा प्रतिप्रश्न केला. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी संभ्रमात पडले. 

पुनरावृत्ती होऊ द्यायची का?
नाशिकमध्ये मनसे पक्ष मोठा केला. तीन आमदार, महापालिकेत सत्ता आणली. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये सदस्य निवडून आणले. राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक वेगाने मनसे फैलावत असताना राज्य पातळीवरील काही नेत्यांना ते सहन झाले नाही. त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे चुकीची माहिती पोहोचवून त्यांनी मला पक्षातून बाहेर पडण्यास भाग पडले. आता पुन्हा मनसेला नव्याने उभे केल्यानंतर त्याची पुनरावृत्ती होवू द्यायची का, असा सवाल गिते यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना केला.

शिवसेना माझी आई
श्री. गिते यांनी शिवसेना माझ्यासाठी आई असल्याचे सांगत शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. श्री. गिते बालपणापासून शिवसेनेचे कार्यकर्ते होते. शिवसेनेचे नगरसेवक म्हणून ते प्रदिर्घ काळ महापालिकेत त्यांनी काम केले आहे. शिवसेनेचे महापौर म्हणून त्यांनी शहरात अनेक नव्या संकल्पना राबविल्याने शहरातील लोकप्रिय नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा स्रव क्षेत्रात मोठा संपर्क आहे. त्यामुळे ते शिवसेनेत परतल्यास शिवसेनेतील जुन्या फळीतील बव्हंशी नेत्यांची ताकद शिवसेनेला पुर्नप्राप्त होईल.

मिसळ पार्टीचे राजकारण
नववर्षाच्या सुरवातीला गिते यांनी मिसळ पार्टी घेऊन राजकीय बदल होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने काही संकेतदेखील मिळत असून, शिवसेनेचे खासदार संजय राऊत गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येणार असून, त्यात गिते व सुनील बागूल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com