रोहित पवार यांनी केली अपघातग्रस्ताला मदत - Rohit Pawar Helped Accident Victim | Politics Marathi News - Sarkarnama

रोहित पवार यांनी केली अपघातग्रस्ताला मदत

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एका अपघातग्रस्ताला मदत केल्याचा व स्वतः गाडी ढकलून खड्डयातून बाहेर काढल्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.  

सातारा : जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एका अपघातग्रस्ताला मदत केल्याचा व स्वतः गाडी ढकलून खड्डयातून बाहेर काढल्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.  

कर्‍हाड येथून नातेवाईकांचा अंत्यविधी आटोपून पुन्हा बारामतीकडे जात असताना रोहित पवार आपले मित्र छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज ( बाबा ) गोडसे गाडीतून काहीकाळ प्रवास करत असताना  मांडवे ता. खटाव  ते पिंगळी ता. माण ( जि. सातारा ) या दरम्यान दहिवडी येथील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी नेत असताना त्यांनी अपघात झालेला पाहिला. 

त्यावेळी रोहित पवार यांनी  गाडी थांबवली आणि तातडीने अपघात स्थळी धावत गेले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रस्त्याच्या खाली गेलेली अपघातग्रस्त गाडी बाहेर काढून जखमींना तातडीने उपचारासाठी पाठवले. 

हे देखिल वाचा
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर राजू शेट्टी २३ पासून काढणार पायी मोर्चा

सातारा : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेत्तृत्वाखाली दि. २३ ते २५ या कालावधीत सातारा ते कराड असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची समाप्ती दि. २५ रोजी कराड येथे होणार असून त्याबाबतचे निवेदन आज संघटनेच्या वतीने राजू शेळके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ, देवानंद पाटील, जनार्दन आवारे, संजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख