बिहारच्या तरुण नेत्याची केंद्रातल्या सत्तेला काँटे की टक्कर - संजय राऊत - Sanjay Raut Praises Tejaswi Yadav | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारच्या तरुण नेत्याची केंद्रातल्या सत्तेला काँटे की टक्कर - संजय राऊत

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

बिहार निवडणुकीचे निकाल पूर्ण यायचे आहेत. पण जे कल समोर येत आहेत, त्यानुसार एक तरुण नेता केंद्रातल्या सत्तेला काँटे की टक्कर देतो आहे. एक तेजस्वी पर्व सुरु होते आहे, असे चित्र आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. 

मुंबई : बिहार निवडणुकीचे निकाल पूर्ण यायचे आहेत. पण जे कल समोर येत आहेत, त्यानुसार एक तरुण नेता केंद्रातल्या सत्तेला काँटे की टक्कर देतो आहे. एक तेजस्वी पर्व सुरु होते आहे, असे चित्र आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. 

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. सुरुवातीचा कल पाहता तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन आघाडी घेताना दिसते होती. पण नंतरच्या तासात पुन्हा कल बदलल्याचे दिसते आहे. एनडीएने ११५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महागठबंधन ९७ जागांवर आघाडीवर आहे. या सुरुवातीच्या ट्रेंडबाबत राऊत म्हणाले, " तेजस्वी यांच्या समोर पूर्ण मंत्रिमंडळ होतं, पण या मुलानं ज्या पद्धतीने टक्कर दिली आहे, तो भविष्यसाठी एक मोठा संकेत आहे. 

आज जंगलराज संपून मंगलराज येईल. बिहारचा निकाल काही लागू द्या, पण ज्या प्रकारे जनतेने साहस दाखवले आहे, त्याचा परिणाम देशाच्या राजकारणावर होणार आहे,'' महाराष्ट्रात बदल घडला तेव्हाच देशातही बदल होऊ शकतो, याचा संदेश देशभर गेल्याचेही राऊत म्हणाले. 

Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख