Sachin Pilot Unlikely to Attend Congress Meeting today at Jaipur | Sarkarnama

सचिन पायलट आजही बैठकीला अनुपस्थित राहणार?

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जुलै 2020

सचिन पायलट यांनी आपणाकडे १६ आमदार असल्याचा दावा केला आहे. काल झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत १०६ आमदार उपस्थित असल्याचा दावा ही अतिशयोक्ती असल्याचे सचिन पायलट यांनी म्हटले आहे. राजस्थान विधानसभेची सदस्यसंख्या २०० असून बहुमतासाठी १०१ आमदारांची गरज आहे. 

नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवलेले उपमुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांना मनविण्याचे प्रयत्न सुरुच आहे. आज सकाळी दहा वाजता एक बैठक आयोजित करण्यात आली असून त्यासाठी सर्व आमदारांना बोलावण्यात आले आहे

सचिन पायलट यांनी आपणाकडे १६ आमदार असल्याचा दावा केला आहे. काल झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत १०६ आमदार उपस्थित असल्याचा दावा ही अतिशयोक्ती असल्याचे सचिन पायलट यांनी म्हटले आहे. राजस्थान विधानसभेची सदस्यसंख्या २०० असून बहुमतासाठी १०१ आमदारांची गरज आहे. 

पायलट सध्या दिल्लीजवळील एका पंचतारांकित हाॅटेलात मुक्कामाला आहेत. आज काँग्रेसने पुन्हा एकदा आमदारांची बैठक बोलावली आहे. मात्र, सचिन पायलट व त्यांचे समर्थक आमदार या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. जयपूरमधील एका पंचतारांकित हाॅटेलात ही बैठक होणार आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यातील वाद उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर पायलट यांचे बंड थंड करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पुढे सरसावले आहेत. पायलट यांनी नाराजी दूर करण्याची जबाबदारी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि पी.चिदंबरम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट यांना समजावण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. पायलट हे कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने खुद्द राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीच त्यांच्याशी संपर्क साधला आहे. पायलट यांची समजूत काढून त्यांचे बंड थंड करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि पी.चिदंबरम यांच्यावर पायलट यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. याचबरोबर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे  सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल हेही पायलट यांच्याशी चर्चा करीत आहेत. 

कर्नाटक आणि मध्य प्रदेशची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये सहजासहजी शक्य नसल्याचे मानले जात आहे. यातच मुख्यमंत्री गेहलोत यांनी त्यांच्याकडे 109 आमदार असल्याचा दावा केला आहे. यामुळे सरकारला धक्का बसण्याची शक्यता नाही. मात्र, पायलट यांच्या बंडामुळे पक्षात अस्वस्थता आणि नाराजी वाढत आहे. पायलट यांनी 2018 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी डावलण्यात आले होते. पायलट यांच्यावर अन्याय झाला, असा सूर पक्षातून मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. यामुळे पायलट यांनी नाराजी दूर करुन पक्षातील अस्वस्थता दूर करण्यासाठी अहमद पटेल आणि चिदंबरम हे सातत्याने त्यांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

होय, दिल्लीमध्ये पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत सातव यांची चर्चा झाली , आणि त्यानंतर ते जयपूर कडे , महत्वाचा संदेश घेऊन रवाना झाल्याची माहिती सातव यांच्या  निकटवर्तीयांनी दिली आहे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख