सोशल मीडियापासून दूर.. नोकरी सांभाळून डीवायएसपीपदी  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आरती पवार ही मुलींमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. पवार हीने पहिल्या प्रयत्नात हे यश मिळविले आहे.
pawarf
pawarf

केडगाव (पुणे) : "स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर टिव्ही व सोशल मीडियापासून दूर रहा. रोज दहा बारा तास अभ्यास केला तर सामान्य विद्यार्थी सुद्धा यश मिळवू शकतो. यश मिळपर्यंत पिच्छा सोडू नका," असे मत देऊळगावगाडा ( ता.दौंड ) येथील डीवायएसपीपदी निवड झालेली आरती राजेंद्र पवार हीने व्यक्त केले आहे. 
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आरती पवार ही मुलींमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. पवार हीने पहिल्या प्रयत्नात हे यश मिळविले आहे. आयोगामार्फत तिची चौथ्यांदा निवड झाली आहे. यापुर्वी त्यांची पोलिस उपनिरीक्षक, मंत्रालय कक्ष अधिकारी व कर अधिकारी म्हणून तिची निवड झाली आहे. सध्या ती बारामती नगरपालिकेमध्ये कर अधिकारी म्हणून नोकरीला आहे. जिल्हा परिषदेचे आदर्श
प्राथमिक शिक्षक राजेंद्र पवार यांची ती मुलगी आहे. तिचे प्राथमिक शिक्षण देऊळगावगाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्यांच्या या यशाबद्दल देऊळगावगाडा येथे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 
 
या यशाबद्दल आरती पवार म्हणाल्या,  "गेली तीन वर्ष मी साधा मोबाईल फक्त कॅालिंगसाठी वापरला आहे. सोशल मीडियापासून मी सुरवातीपासून दूर राहिले आहे. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनी असा कोणताही न्यूनगंड बाळगू नये. माझ्या आई वडीलांनी मला खूप सहकार्य केले. मला कोणतेही काम सांगितले नाही. किंवा माझ्यापुढे कोणत्याही समस्या आणल्या नाहीत. मला प्राध्यापक व्हायचे होते. मात्र, बरोबर आजपासून तीन वर्षापुर्वी १९ जून २०१७ रोजी मी शिवाजीराव मोरे यांच्या राज अॅकेडमीने आयएएस झालेल्या सुरज जाधव यांचे व्याख्यान ठेवले होते. ते ऐकले आणि प्राध्यापकाची नोकरी सोडली. आणि फक्त स्पर्धा परीक्षेवर फोकस केला. गेल्या अडीच वर्षात मी चार स्पर्धा परीक्षा क्रॅक केल्या. आई व वडीलांनी मला पुर्ण फ्री हॅंड दिला होता. विश्वनाथ कौले हे प्राथमिक शिक्षक व आई-वडीलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. स्पर्धा परीक्षेचे क्लासेस लावणे गरजेचे वाटत नाही. कारण क्लासेस हे फक्त तुम्हाला दिशा दाखवतात. मेहनत प्रत्येकाला आपआपली करावी लागते. आज मिळालेले यश अपेक्षेपेक्षा मोठे आहे.

राजेंद्र पवार म्हणाले, आरतीने आमच्या समाजाचे, घराण्याचे नाव उज्वल केले आहे. मला दोन्ही मुली आहेत. मुलाचा विचार कधीच डोक्यात आलाच नाही. मुलींना खूप शिकवायचे हेच ध्येय ठेवले. दुसरी मुलगी पुजा इन्फोसिसमध्ये अधिकारी आहे.

हेही वाचा : 'हा' निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी मांडलेला खेड आहे...

पुणे : अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर भाजपचे नेते आशीष शेलार यांनी टिका केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. या निर्णयावर शेलार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात व्हिडिओमध्ये ते म्हणतात की अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांशी धोका आणि त्यांच्या भवितव्याशी मांडलेला खेळ आहे. राज्य सरकारने हा अजब निर्णय घेतला असल्याची टीका आशीष शेलार यांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com