महाड दुर्घटना : तब्बल 40 तास पोकलेन चालवून बीडच्या पोराने वाचवले जीव

किशोरच्या कामगिरीचे अनेकांनी केले कौतुक
kishor poklen driver mahad
kishor poklen driver mahad

पुणे : महाड (जि. रायगड) येथील तारिक गार्डन इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा बळी घडली. या दुर्घटनेनंतर शोध व बचाव पथके ढिगारा उपसून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना सोडविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केेले. या प्रयत्नात पोकलेन चालक किशोर लोखंडे याने बजावलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

ही घटना 24 आॅगस्ट रोजी सायंकाळी घडली. या वेळी किशोर महामार्गावरील कामावर होते. ठेकेदाराचा फोन येताच त्यांनी पोकलेनला तारीक गार्डनच्या दिशेने नेले. घटनास्थळी पोहोचताच त्याने कामाला सुरवात केली. तब्बल चाळीस तासांहून अधिक काळ ते पोकलेनवरच होते. आज (ता. 26 आॅगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजता फोन केला तेव्हा ते ढिगारे उपसण्याचे काम करत होते. सकाळपासून त्यांनी काही न खाता-पिता अखंडपणे पोकलेनेची घरघर सुरू ठेवली होती. 

माणसं ढिगाऱ्याखाली अडकलीत, झोप कशी येणार आणि भूकही कशी काय लागेल, असा त्यांचा त्यावरील सवाल होता. त्यांनी या दुर्घटनेतून दहा जणांचे मृतदेह बाहेर काढले. ``कालपासून मी 10 डेडबॉडी ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्यात, ते बघून लय वाईट वाटतंय. पण काल एका 4 वर्षाच्या पोराला जिंवत बाहेर काढल्यानंतर मला लय भारी वाटलं, आनंद झाला होता. तो मुलगा जिवंत बाहेर आल्याचं पाहिल्यानंतर कामाचा ताणच गेला, उलट पुन्हा जोमात काम करायला लागलाे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

बीड जिल्ह्यातील टोदा_तालुक्यातील उखंडा लिंबादेवी गावचे असलेले किशोर हे गेली सहा वर्षे पोकलेन चालविण्याचे काम करत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांना शोधण्यासाठी शिताफिने पोकलेन चालविण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्यांचा पोकलेन आल्यानंत इतरही चार पोकलेन घटनास्थळी आले होते. त्यांनीही मग ढिगारे उपसण्याचे काम सुरू केले. पण जी जिद्द किशोर यांनी दाखविली त्याबद्दल त्यांच सर्वत्र कौतुक होत आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही या भूमिपूत्राच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com