खासदार हीना गावित. डॉ. सुभाष भामरे ठरले ‘संसदरत्न’

धुळे मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे आणि नंदुरबारच्या खासदार डॉ. हीना विजयकुमार गावित यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे शनिवारी झालेल्या अकराव्या संसदरत्न पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात करण्यात आला.
Heena Gavit- Subhash Bhamre
Heena Gavit- Subhash Bhamre

नाशिक : धुळे मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे आणि नंदुरबारच्या खासदार डॉ. हीना विजयकुमार गावित यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे शनिवारी झालेल्या अकराव्या संसदरत्न पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात करण्यात आला.  

प्राइम पॉइंट फाउंडेशनतर्फे लोकसभा व राज्यसभेत सर्वाधिक प्रश्‍न विचारणे, विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेणे आदींतून लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार दिले जातात. एकूण पाच गटांत हे पुरस्कार प्रदान केले जातात. या वेळीही ५४३ खासदारांमधून अशा संसदरत्नांची निवड करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. धुळ्याचे खासदार डॉ. भामरे यांना सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला. याशिवाय महिला खासदारांमध्ये नंदुरबारच्या खासदार डॉ. हीना गावित, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाही हा पुरस्कार मिळाला.

संसदेच्या सभागृहात झालेल्या ११ व्या संसदरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पटनाईक, संसदीय कार्यमंत्री अर्जुन मेघवाल यांच्या हस्ते डॉ. भामरे यांना पुरस्कार मिळाला. संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खा. डॉ. भामरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मार्गदर्शनामुळे व त्यांनी दिलेल्या संधीमुळेच आपल्याला लोकसभेत चांगला परफॉर्मन्स करण्याची प्रेरणा मिळाली, तसेच धुळे जिल्ह्यातील व लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रेमामुळेच आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याचे डॉ. भामरे यांनी म्हटले आहे.  

पुरस्काराबद्दल नंदुरबार येथे भारतीय जनता पार्टीतर्फे फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी सविता जयस्वाल, सपना अग्रवाल, जवाहर जैन, मोहन खानवाणी, संजीव शाह, सुभाष पानपाटील, मिलिंद मोहिते, गोपी उत्तमाणी, दुर्गेश राठोड, जयेश चौधरी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com