सरोज खान यांनी 'बिग बी' यांना का दिलं होतं..एक रूपयाचं नाणं... 

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर अशीच एक आठवण शेअर केली आहे. सरोज खान यांच्यासोबत असलेला फोटो त्यांनी शेअर केला आहे. बिग बी यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.
3Amitabh_Bachchan1_0
3Amitabh_Bachchan1_0

मुंबई : प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर अशीच एक आठवण शेअर केली आहे. सरोज खान यांच्यासोबत असलेला फोटो त्यांनी शेअर केला आहे. बिग बी यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. 

सरोज खान यांच्या निधनाविषयी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की सरोज खान या आपल्या सोबत चांगले काम करीत असलेल्या कलाकाराचे नेहमीच कैातुक करीत असतं. त्या कलाकार बोलवून त्या त्याला एक रूपयांचे नाणं भेट देत असतं. खूप वर्षानंतर सरोज खान यांच्यासोबत एक गाण्यासाठी नृत्य करीत होतो. त्यांना माझे काम आवडले. त्यानंतरही त्यांनी मला एक रूपयांचे नाणं भेट दिलं होतं. तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. सरोजजी, तुम्ही मला बॅालिवुडला एक रिदम, शैली दिली.  

सरोज खान यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना अमिताभ बच्चन यांनी उजाळा दिला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की एका चित्रपटाच्या शुटिंगवेळी सरोज खान या गर्भवती होत्या. पण अशा परिस्थितीतही त्यांनी आपल्या नृत्याकडे दुर्लक्ष केले नाही. एका मुलाखतीत त्यांना माझ्या कामाचे कैातुक केले होते. लग्नानंतर त्या दुबईत राहत होत्या. त्यावेळी माझा 'डॅान' चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा त्यांनी सांगितले की मी हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले होते. 'खैके पान बनारस वाला गाणं..' हे गाणं मला खूप आवडलं होतं. या गाण्यावरील माझे नृत्य त्यांना खूप आवडले होते. 
 
सरोज खान (वय 72) यांचे मुंबईत बांद्रा येथील रूग्णालयात मध्यरात्री निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर गुरूनानक रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी मुंबईत झाला होता. सरोज खान यांचे नाव निर्मला नागपाल होते.  भारत-पाकिस्तान विभाजनानंतर त्या भारतात आल्या होत्या. त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून बाल कलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात काम केले होते. त्यांनी आपले नृत्यगुरू सोहनलाल यांच्याशी लग्न केले होते. 

1986 पासून त्यांनी चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून कामास सुरवात केली. 2019 पर्यंत त्या चित्रपट क्षेत्रात सक्रिय होत्या. चालबाज, नगीना, तेजाब, खलनायक, मिस्टर इंडिया, चांदनी, हम दिल दे चुके सनम, देवदास सारख्या प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी कोरियाग्राफी केली होती. कलंक हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. कलंक या चित्रपटातील  'तबाह हो गए... ' यासाठी कोरियाग्राफ केले होते. यात माधुरी दिक्षित नृत्य करताना दिसत आहे. आतापर्यंत सुमारे 200 पेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी कोरिओग्राफर म्हणून काम केले होते. दिल धक धक करने लगा, डोला रे डोला, काटे नही कटते, हवा-हवाई, निंबुडा-निंबुडा, एक-दोन तीन, ना जाने कहा से आई है, हमको आजकल है इंतजार, चोली के पीछे यासारख्या अनेक सुपरहिट आणि ऐतिहासिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांनी केले होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com