साक्षी पाळेकरचा रिझल्ट समजताच खासदार श्रीनिवास पाटील पाटणच्या गारवडेत पोहचले!

परिसरातील अकरा मुलींना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यांचे खासदार पाटील यांनी कौतुक केले.
 mp shrinivas patil congratulate sakshi palekar for ninety nine parcent   marks
mp shrinivas patil congratulate sakshi palekar for ninety nine parcent marks

पुणे : सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील गारवडे येथील साक्षी पाळेकर या विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेत 99.40 टक्के मार्क मिळाल्याचे  समजताच  खासदार श्रीनिवास पाटील यांनी थेट तिच्या घरी जाऊन सत्कार केला. 

खासदार श्रीनिवास पाटील यांचे गाव मारुल हवेली. त्या गावाच्या शेजारीच गारवडे आहे. या गावातील साक्षी पाळेकर विद्यार्थिनीला 99.40 एवढे गुण मिळाल्याची बातमी खासदार पाटील यांना समजली. ते त्या मुलीच्या घरी गेले. यावेळी त्यांनी गावातील इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. पाटण येथील तन्वी विजयकुमार चाळके या विद्यार्थीनीने देखील ९९.८० टक्के गुण मिळविले आहेत. तिचाही खासदार पाटील यांनी सत्कार केला. 

या परिसरातील अकरा मुलींना  90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यांचे खासदार पाटील यांनी कौतुक केले. बहुले, मारूल हवेली, नावडी व पाटण येथील विद्यार्थ्यांकडे जावून शाल, श्रीफळ, पुष्षगुच्छ भेट देऊन व पेढा भरवून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या शिक्षणासाठी कष्ट घेणा-या पालकांचाही सत्कार करण्यात आला.

"विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. तो त्यांनी यशस्वीपणे पार पाडला. यासाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे. त्यांना शाब्बासकी मिळाली की ते आणखी चांगले यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहतील. त्यांच्या यशामध्ये शिक्षकांचे देखील महत्वाचे योगदान असून त्यांचे देखील आभार"असे खासदार पाटील यांनी म्हटले आहे.

"ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले नाहीत किंवा यश प्राप्त झाले नाही त्यांनी खचून जावू नये. गणित, विज्ञान, भाषा याशिवाय इतर क्षेत्राकडे त्यांचा कल व आवड असू शकते. हे ओळखून मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. आजच्या युगात यशस्वी होण्यासाठी केवळ डॉक्टर अथवा इंजिनियरच झाले पाहिजे अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. सध्या मुलांना अनेक आकर्षक क्षेत्रात त्यांचे गुण दाखविण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे त्या योग्य दिशेने विचार करून विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडावे."असे आवाहन त्यांनी केले आहे.

सिध्दार्थ महाविद्यालच्या दुरुस्तीसाठी निधी देणार

मुंबई : सिध्दार्थ महाविद्यालयाच्या आनंदवन इमारतीच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन आज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. या प्रश्नावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे आश्वासन दिले.  

Edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com