राज्यात कोरोनाच्या ३७ हजार ५३४ रुग्णांवर उपचार सुरू : आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध असून सध्या ३६ हजार १८९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
more than thirty seven thousand corona positive patients under treatment maharashtra health minister says
more than thirty seven thousand corona positive patients under treatment maharashtra health minister says

मुंबई : राज्यात आज ७७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २३६१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार ५३४  रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ७१ हजार ५७३ नमुन्यांपैकी ७० हजार ०१३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६७ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध असून सध्या ३६ हजार १८९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. 

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७० (मुंबई ५२, ठाणे ५, नवी मुंबई ९,  कल्याण डोंबिवली ४), नाशिक- ६ (मालेगाव ६), पुणे- ११ (पुणे ९, सोलापूर २), लातूर-१ (उस्मानाबाद १), अकोला-१(यवतमाळ १).  आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४५ पुरुष तर ३१ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ७६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३७  रुग्ण आहेत तर ३६  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ७६ रुग्णांपैकी ५१ जणांमध्ये ( ६७ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३६२ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे १४ मे ते २८ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील २२ मृत्यूंपैकी मुंबई ९, नवी मुंबई -५, औरंगाबाद -३, रायगड – २, बीड -१, मीरा भाईंदर -१ आणि ठाणे १ असे आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३२९४ झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ६७४ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ७०.६९  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ७१ हजार ५७३ नमुन्यांपैकी ७० हजार ०१३ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com