mla dilip lande demands bhratratna award for annabhau sathe
mla dilip lande demands bhratratna award for annabhau sathe

अण्णाभाऊंना 'भारतरत्न' द्या; आमदार दिलीप लांडेंची मागणी 

अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मातंग समाजाची गेले अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे.

मुंबई :  साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी चांदीवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

अण्णाभाऊ साठे हे थोर समाजसुधारक, क्रांतिकारक होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र व गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळी जनजागृतीचे मोठे काम केले होते. तसेच त्यांनी बहुजन समाजाच्या न्याय-हक्कांसाठीच्या लढ्यात महत्वाची कामगिरी बजावली. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशील होते. त्यांचे साहित्य ४२ भाषांमध्ये भाषांतरित केले गेले आहे. 

अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मातंग समाजाची गेले अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. अनेक राजकीय पक्षांनी व लोकप्रतिनिधींनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केवळ खोटी आश्वासने देऊन समाजाच्या तोंडाला नेहमीच पाने पुसली.  देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करण्यासाठी त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात यावी अशी मागणी लांडे यांनी या पत्रात केली आहे.

अजित पवारांनी घेतला पुण्याचा आढावा

पुणे : पुणे जिल्हयातील 'कोरोना' बाधित संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेवून तातडीने तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.   

विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, सहकार आयुक्त अनिल कवडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे  संचालक कौस्तुभ दिवेगावकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, शासनाचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ.
मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

Edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com