पोलीस हवालदार आकाशचा अभिमान वाटतो : गृहमंत्री देशमुख

काल दि.३ रोजी हिंदुजा रुग्णालय , मुंबई येथे १४ वर्षांच्या सनाफातिम खान या छोट्या मुलीला अचानक ओपन हार्ट सर्जरी वेळी A+ रक्त लागणार होते.
 maharashtra home minister anil deshmukh congratulate havaldar aakash on phone call
maharashtra home minister anil deshmukh congratulate havaldar aakash on phone call

मुंबई  : मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश गायकवाड यांनी काल ओपन हार्ट सर्जरी होणाऱ्या एका छोट्या मुलीला स्वतःचे रक्त देऊन माणुसकीचे नाते जपले, त्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी "आकाश तुझा आम्हाला अभिमान आहे" अशा शब्दांत त्याचे फोन करून विशेष अभिनंदन केले.

काल दि.३ रोजी हिंदुजा रुग्णालय , मुंबई येथे १४ वर्षांच्या सनाफातिम खान या छोट्या मुलीला अचानक ओपन हार्ट सर्जरी वेळी A+ रक्त लागणार होते. मुंबईमध्ये निसर्ग चक्रीवादळ व कोरोनामुळे रक्त देण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य असे कोणीही रुग्णालयात येऊ शकले नाही. अशा गंभीर परिस्थितीत दवाखान्यात नेमणुकीस असलेले ताडदेव पोलिस स्टेशनचे ऑन ड्युटी पोलीस (क्रमांक१४००५५) आकाश बाबासाहेब गायकवाड यांनी फक्त माणुसकी हाच आपला धर्म समजून व पोलीस ब्रीदवाक्य सद्रक्षणाय यास अनुसरून तिच्यासाठी अशा संकटप्रसंगी धावून आले. आपले रक्तदान करून या मुलीला जीवनदान दिले.   कोणत्याही संकटसमयी पोलीस हे देवदूत बनून मदतीला येतात. हे यातून पुन्हा सिद्ध झाले.  कोरोना संसर्ग असो की निसर्ग चक्रीवादळ. सर्वसामान्य नागरिकांसाठी पोलीस दलाचा कायमच भक्कम आधार आहे. आकाश गायकवाड यांच्यासारख्या योद्ध्यांना माझा सलाम! या संपूर्ण पोलीस कुटुंबाचा प्रमुख म्हणून मला आपल्या पोलीस दलाचा अभिमान आहे, या शब्दांत गृहमंत्र्यांनी आकाशचा गौरव केला.


ग्रामपंचायतींच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रकार थांबवावा!

शिक्रापूर (जि. पुणे) : मोदी सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याबरोबरच ग्रामपंचायती स्वावलंबी बनविण्यासाठी वित्त आयोगाचा शंभर टक्के निधी ग्रामपंचायतींना देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. असे असताना राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने मात्र राज्यभरातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींच्या १३ व्या व १४ व्या वित्त आयोगाचा निधी कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारला तातडीने जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतींच्या निधीवर डल्ला मारण्याचा हा प्रकार ठाकरे सरकारने थांबवावा, अशी मागणी भाजपाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी उद्धव ठाकरे केली आहे.

ग्रामीण भागातील जनतेची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम-३० च्या गोळ्या मोफत देण्याचे निमित्त पुढे करुन ठाकरे सरकारने राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींच्या तिजोरीतील पैसा जिल्हा परिषदांना आदेश देऊन मागितला आहे. १३ व्या वित्त आयोगाची अखर्चित रक्कम व १४ व्या वित्त आयोगाचे व्याज अशी रक्कम राज्य सरकारकडून घेण्यात येणार आहेत. त्यातून या गोळ्यांचे वाटप मोफत केले जाईल. या सगळ्या उलट्या गंगेचा कारभार राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून केला जात आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com