पुढच्या एकादशीला कोरोनाचं संकट जगातून हद्दपार झालेलं असेल!

जनतेला सुखी ठेव… कोरोनाविरुद्ध लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य-सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशाताई, पोलिस या सगळ्या कोरोनायोद्ध्यांना बळ दे.. त्यांचं संरक्षण कर…
 Maharashtra deputy chief minister ajit pawar pray god vithoba
Maharashtra deputy chief minister ajit pawar pray god vithoba

मुंबई :  “देवा पांडुरंगा, राज्यात यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे… बळीराजाच्या शेतात, घरात समृद्धी नांदू दे… ‘कोरोना’चं संकट दूर करुन सर्वांना चांगलं आरोग्य दे… देवा विठ्ठला महाराष्ट्राचं भलं कर, राज्यावरचं प्रत्येक संकट दूर करण्याची शक्ती आम्हाला दे…” असं साकडं पंढरपुरच्या पांडुरंगाचरणी घालत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकदशीनिमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी वंदन केलं असून महाराष्ट्राला, देशाला, जगाला कोरोनामुक्त कर, अशी आळवणी विठ्ठलाकडे केली आहे. पंढरपुरच्या वारीची शेकडो वर्षांची परंपरा यावर्षीही प्रतिकात्मक पद्धतीनं कायम राखली गेली. संतांच्या पादूका परंपरेनुसार पंढरपूरला पोहचल्या, याचा आनंद व्यक्त करत असतानाच कोरोनाचं संकट लक्षात घेऊन आपापल्या घरी थांबून, आषाढी एकदशीला घरूनच पंढरपूरच्या विठ्ठलाचं स्मरण, पूजा, भक्ती करत असलेल्या लाखो वारकऱ्यांनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केलं आहे. त्यांचे आभार मानले आहेत. पुढच्या एकादशीला कोरोनाचं संकट जगातून हद्दपार झालेलं असेल आणि पुन्हा आपण नाचत, गाजत पंढरपूरची वारी करु, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन पांडुरंगभक्तांनी, राज्यातील जनतेनं अधिक काळजी घ्यावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनमध्ये दुसऱ्यांदा मुंबईबाहेर

पुणे: कोरोना महामारीच्या संकटामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत थांबूनच संपुर्ण परिस्थिती हाताळत आहेत. चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते काही तास अलिबागजवळ आले होते. आज आषाढी वारीच्या महापूजेसाठी ते दुसऱ्यांदा मुंबईबाहेर पडत आहेत. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तीन महिन्यातच राज्यात कोरोनाचे संकट आले. मुख्यमंत्र्यांनी 23 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या टप्प्यात प्रार्दुभावाचा अंदाज येत नव्हता. त्यातच लोकांना मूळ गावी जाण्याची घाई होती. मुख्यत: परप्रांतिय लोकांना परत पाठवण्याचे आव्हान होते. केंद्र सरकारचे धोरण, तसेच संबंधित राज्यांचा समन्वय याकामी महत्वाचा होता. यातूनही सरकारने मार्ग काढत लाखो लोक परराज्यात पाठवले. त्यानंतर राज्यातील अडकलेले लोक आपापल्या जिल्ह्यात पाठवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. हे काम सुरू असतानाच जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळ आले. त्यामुळे मोठे नुकसान झाले. ते पाहण्यासाठी काहीवेळ उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यात आले होते. लगेचच परत जावून त्यांनी मुंबईत बैठक घेतली. त्यानंतर आता मुख्यमंत्री दुसऱ्यांचा मुंबई बाहेर पडत आहेत. त्यांच्याहस्ते उद्या पहाटे पंढरपूरमध्ये विठ्ठल रूक्मीणीची महापूजा होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com