jalgaon mp unmesh patil on modi government completing one year | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

केंद्र सरकारने अत्यंत धैर्याने 'कोविड' संकटाचा सामना केला: खासदार उन्मेश पाटील

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 मे 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारच्या दुसऱ्या पंचवार्षिक टप्यात पहिले वर्ष पूर्ण झाले आहे

जळगाव : जम्मू काश्‍मीरसाठी लागू असलेले 370 कलम रद्द करून 'एक देश एक संविधान' लागू करण्यात आले. राम मंदिराबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर शासनाने ताबडतोब हा प्रश्‍न सोडविला. कॉर्पोरेट टॅक्‍स कमी करून परकिय गुंतवणूक वाढीस चालना दिली. तर 'कोविड'च्या संकटाशी धैर्याने मुकाबला करून जगात 'भारतीय पॅटर्न' विकसित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे दुसऱ्या पंचवार्षिक टप्प्यातील पहिले वर्ष ऐतिहासिक निर्णयाचे वर्ष ठरले आहे. असे मत भारतीय जनता पक्षाचे जळगाव लोकसभा मतदार संघातील खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारच्या दुसऱ्या पंचवार्षिक टप्यात पहिले वर्ष पूर्ण झाले आहे. केंद्रातील सरकारच्या कामगिरीबाबत बोलताना खासदार उन्मेश पाटील म्हणाले, केंद्रातील सरकारने वर्षभरात अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. जम्मू काश्‍मिरसाठी लागू असलेले 370 कलम रद्द करण्याबाबत प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत होता. मात्र दुसऱ्या टप्प्यात सत्ता मिळताच केंद्र सरकारने संसदेत ठराव मंजूर करून जम्मू काश्‍मिरला लागू असलेले 370 कलम रद्द केले. एक संविधान, एक देश लागू करण्यात आला. राम मंदिराबाबतचा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत होता. न्यायालयाने त्याबाबत निकाल देताच केंद्र सरकारने समिती नियुक्त करून त्याबाबत निर्णय घेवून ताबडतोब मंदिराचे कामही सुरू केले आहे. या शिवाय परकिय गुंतवणूक वाढविण्यासाठी कार्पोरेट टॅक्‍सही कमी करण्यात आला, त्यामुळे देशात परकिय गुंतवणूक वाढीस चालना मिळाली.
 
संपूर्ण जगावर 'कोविड'चे संकट आहे. भारतातही हे संकट आले आहे. मात्र केंद्र सरकारने अत्यंत धैर्याने त्याचा सामना केला. त्यामुळे भारतात हानी कमी झाली आहे. जगात 'भारतीय पॅटर्न' आता विकसित होत आहे.
 
वर्षभरात जळगाव जिल्ह्यातही विकास कार्य झाल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. याबाबत ते म्हणाले, जळगाव विमानतळावर 'नाईट लॅंडीग' मंजूरी मिळाली आहे.  केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत घर-घर पाणी अंतर्गत 70 टक्के घरांना पाणी पुरवठा करण्यात आला. अटल भूजल योजनेतर्गत जिल्ह्यात 82 गावांचा सामावेश करण्यात आला आहे. औरंगाबाद जळगाव महामार्गाच्या कामास चालना देण्यात आली आहे. तर जळगाव ते नांदगाव हा महामार्ग 600 कोटी रूपये खर्च करून सिमेट क्रॉकीटचा करण्यात आला आहे. सद्यस्थितीत सिमेंटचा पूर्ण झालेला राज्यातही एकमेव महामार्ग आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख