राजेंद्र देशमुखांपासून आर. आर. आबांपर्यंत टिकेची झोड उठवून प्रसिद्ध झाले पडळकर!

मिरज येथील एका प्रचारसभेत आर आर पाटील आणि त्यांचे बंधू सुरेश पाटील यांचा उल्लेख करून वादग्रस्त टीका केली होती. आर आर पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राजकीय खळबळ उडालीहोती.
gopichand padalkar political journey in sangli district
gopichand padalkar political journey in sangli district

पुणे : जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केल्यानंतर नॉटरीचेबल झालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा आजवरचा प्रवास पाहिला तर लोकप्रिय नेत्यांवर टीका करून प्रसिद्धीच्या झोतात येणे असाच राहिलेला आहे. आटपाडी तालुक्यातील स्थानिक नेत्यांवर वादग्रस्त टीका करणाऱ्या पडळकरांनी आता थेट शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी हे पडळकर यांचे गाव. राजकारणात सक्रिय होण्याचा विचार करत असताना त्यांची राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची भेट झाली. महादेव जानकर यांनी या तरुणाला आपल्या पक्षात घेतले. पक्षीय जबाबदारी सोपवली. याच काळात पडळकर यांचे कार्यक्षेत्र विस्तारले. त्यांनी आटपाडी तालुक्यातील राजेंद्र देशमुख, तानाजी पाटील यासह काही जेष्ठ नेत्यांवर कडव्या भाषेत टीका केली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांना महादेव जानकर यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातून रासपची उमेदवारी दिली. यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून सदाशिवराव पाटील आणि अनिल बाबर अपक्ष म्हणून लढत होते. या निवडणुकीत पडळकर यांनी सदाशिवराव पाटील आणि अनिल बाबर यांच्यावर प्रचारसभांत एकेरी भाषेत टिका केली. मात्र या दोघांनीही पडळकर यांच्याकडे दुर्लक्ष केले.या निवडणुकीत पडळकर यांना 19 हजाराच्या जवळपास मते मिळाली.

या निवडणुकीनंतर काही काळात पडळकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची साथ सोडून भाजपशी संधान साधले. हळूहळू ते भाजपच्या दिशेने गेले. भाजपचे पाठबळ मिळू लागल्यावर त्यांनी तत्कालीन मंत्री जयंत पाटील, आर आर पाटील, पतंगराव कदम यांना टिकेचे लक्ष्य बनवले.  2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी भाजपचे उमेदवार संजय पाटील यांचा प्रचार केला. यावेळी मिरज येथील एका प्रचारसभेत आर आर पाटील आणि त्यांचे बंधू सुरेश पाटील यांचा उल्लेख करून वादग्रस्त टीका केली होती. आर आर पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राजकीय खळबळ उडाली होती.त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून खानापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली. तेव्हा त्यांनी अनिल बाबर, सदाशिवराव पाटील यांच्यावर जहाल भाषेत टिका केली पण तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आर आर पाटील यांच्यावरही जहाल टीका केली. पलूस कडेगाव मतदारसंघात भाजप उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रचारसभेत बोलताना पतंगराव कदम यांच्यावर कडवी टिका केली होती.'त्या त्या भागातील लोकप्रिय नेत्यांच्यावर एकेरी भाषेत टीका करणे' हे पडळकर यांच्या भाषणकलेचे वैशिष्टय राहिले आहे. त्यामुळे ते प्रसिध्दीच्या झोतात आले.

आजवर त्यांनी आटपाडीच्या राजेंद्र देशमुख यांच्यापासून ते संजय पाटील यांच्यावर कडवट टीका केली पण यापैकी कोणीही त्याना प्रतिउत्तर दिले नाही. त्यामुळे ते बोलत राहिले आणि त्याची परिणीती म्हणजे कालचे विधान होय.  भाजप आरक्षणाचा विचार करत नाही असा आक्षेप घेऊन जेव्हा पडळकर बाहेर पडले तेव्हापासून ते खासदार संजय पाटलांवर सातत्याने टीका करत होते. सांगली भाजपत एकही लायकीचा नेता नाही, असे पडळकर म्हणाले होते. नंतर त्यांनी राज्यभरात मेळावे घेतले. आरेवाडीच्या मेळाव्यात त्यांनी ,"मी, माझी आई, माझा भाऊ कोणीही भाजपकडून उभा राहिले तर त्याला मत देऊ नका" असं म्हणत जमलेल्या हजारो लोकांच्याकडून बिरोबाची शपथ घेतली. "भाजपमध्ये पुन्हा जायला मला काय पिसाळलेल कुत्र चावलय का?"अस पडळकर म्हणायचे. पण तेच पडळकर आज भाजपचे आमदार होऊन भाजप बहुजनवादी पक्ष आहे, असं म्हणायला लागले आहेत.

भाजपमधून बाहेर पडलेल्या पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह जयंत पाटील यांचेही दरवाजे ठोठावले होते मात्र त्यांना उमेदवारीचा शब्द कोणीही दिला नाही. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना उमेदवारी दिली मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंचित आघाडी सोडून भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करत बारामतीत निवडणूक लढवली. त्यात त्यांची अनामत रक्कमही जप्त
झाली. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर चांगलेच अडचणीत आले आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना फोन करत आहेत मात्र त्यांचा फोन उचलला जात नाही. त्यावर काही कार्यकर्त्यांनी'बारामतीत पडळकरांना जेवढी मते पडली त्याहून जास्त मिसकॉल त्यांना गेले असतील," अशी मार्मिक टिपणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com