हिंदकेसरी मारुती माने हे एकाचवेळी खासदार आणि सरपंचही होते!

मारूती माने यांना 1988 साली राजीव गांधींनी राज्यसभा खासदार केले होते.
arjun mane about hindkesari maruti mane political career
arjun mane about hindkesari maruti mane political career

पुणे : " हिंदकेसरी मारुती माने हे खासदार होते तेव्हा ते कवठेपिरान गावचे सरपंच होते. ते खासदार झाले तरी त्यांनी आपली गावची नाळ कायम ठेवली. गावकऱ्यांनी त्यांना ज्या सरपंचपदावर बसवलं होतं त्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला नाही. ते एकाच वेळी खासदार आणि सरपंच पदावर काम करत होते. भाऊ दिल्लीत गेले पण त्यांना गावाचा कधीही विसर पडला नाही त्यांनी नेहमीच आपल्या गावाचे नाव अभिमानाने सांगितले आणि भाऊंच्यामुळे कवठेपिरानची सगळ्या भारतामध्ये ओळख झाली," असे हिंदकेसरी मारुती माने यांचे पुतणे अर्जुन माने यांनी सांगितले.

हिंदकेसरी पैलवान आणि राज्यसभेचे माजी खासदार मारुती माने यांचा आज स्मृतीदिन. त्यांचे पुतणे अर्जुन माने यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.  "मी एकदा भाऊंच्या सोबत ध्यानचंद पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. तेव्हाचा एक प्रसंग. आम्ही महाराष्ट्रसदन मध्ये मुक्कामी होतो. रात्री साडेअकरा वाजता आम्ही राहत होतो त्या खोलीच्या दारावर टिक टिक झाली. दारावरची टिकटिक ऐकून भाऊ म्हणाले," अरे  एवढ्या रात्री कोण आलं बघ." मी दरवाजा उघडला तर दारात विलासराव देशमुख होते. त्यांनी मला,"भाऊ कुठं आहेत?"असं विचारलं. भाऊंना पाहून ते आत गेले. त्यांनी वाकून नमस्कार केला आणि भाऊंचे अभिनंदन केले. त्यानंतर ते म्हणाले,"भाऊ तुमचं जेवण झालं नसेल तर तर थोडे जेवता का? मी घरून डबा आणलाय." त्यावर भाऊ नको म्हणाले. त्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत विलासराव देशमुख भाऊंच्यासोबत गप्पा मारत बसले आणि दोन वाजता ते निरोप घेऊन निघून गेले. माझ्यासाठी तो अतिशय अविस्मरणीय प्रसंग होता."असे माने म्हणाले.

"भाऊ खासदार झाले पण तेव्हा गावातील लोकांनाही राज्यसभेचे खासदार म्हणजे काय ? हे माहिती नव्हतं आणि भाऊही खासदार झाले म्हणून वेगळा रुबाव न दाखवता रोजच्यासारखे लोकांच्यात बसत होते. त्यामुळे लोकांना खासदारकीच काही अप्रूप वाटलं नाही. लोक म्हणायचे ,"भाऊ खूप मोठे आहेत. तेव्हा ते आमच्या गावचे सरपंच होते आणि खासदार झाले म्हणून त्यांनी गावचे सरपंचपद सोडलं नाही. आणि सरपंचपदाचा राजीनामा दिला नाही. एकाच वेळेला राज्यसभा खासदार आणि गावचे सरपंच या दोन्ही पदावर काम करणारे हिंदकेसरी मारुती माने हेच एकमेव होते."असे अर्जुन माने म्हणाले.

 दारावरची टिकटिक ऐकून भाऊ म्हणाले," अरे  एवढ्या रात्री कोण आलं बघ." मी दरवाजा उघडला तर दारात विलासराव देशमुख होते.

Edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com