महेश कोठे आज राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार

मधले लोक आणि मध्यस्थ यांच्यामुळे मला ही भेट घेता आली नाही.
Shiv Sena's Mahesh Kothe will join NCP today
Shiv Sena's Mahesh Kothe will join NCP today

सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला शिवसेनेचे नेते महेश कोठे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेश आज (ता. ८ जानेवारी) मुंबईत होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेला "जय महाराष्ट्र' म्हणत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. 

दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा मी प्रयत्न केला. मधले लोक आणि मध्यस्थ यांच्यामुळे मला ही भेट घेता आली नाही. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पर्याय आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करत माहिती कोठे यांनी पत्रकारांना दिली होती. 

महेश कोठे यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत "शहर मध्य'मधून शिवसेनेकडून उमेदवारी अपेक्षित होती. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केलेले दिलीप माने यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून कोठे हे नाराज होते. त्या निवडणुकीत कोठे यांनी बंडखोरी करत विधानसभा लढवली होती. त्यानंतर पक्षाने त्यांच्याकडे सोलापूर महापलिकेतील विरोधी पक्षनेतेपद कायम ठेवले होते. पण, विधानसभेला उमेदवारी नाकारल्याची सल कोठे यांच्या मनात कायम होती. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी महेश कोठे यांनी पक्षातील काही नगरसेवकांना सोबत घेऊन विभागीय आयुक्‍तांकडे स्वतंत्र गट स्थापन करण्याची परवानगी मागितली होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विभागीय आयुक्‍तांकडील कोठे यांचा अर्ज तसाच होता. तो विषय आता विभागीय आयुक्‍तांकडून मार्गी लागल्याने कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेशातील अडसर दूर झाला आहे. 

राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्ता आहे. या तिघांच्या वाटाघाटीत सोलापूर शहर मध्य हा विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळणार नाही. आगामी चार वर्षांत शहर उत्तर या मतदारसंघात विकास कामांच्या माध्यमातून बांधणी करत 2024 च्या निवडणुकीपूर्वी आपले स्थान बळकट करण्यासाठी कोठे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे ठरविल्याचे सांगण्यात येते.

मध्यस्थांमुळे उद्धव ठाकरेंची भेट घेता आली नाही 

शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा मी प्रयत्न केला. मधले लोक आणि मध्यस्थ यांच्यामुळे मला ही भेट घेता आली नाही. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पर्याय आहे. म्हणून आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे कोठे यांनी सांगितले.

कोठे म्हणाले, सोलापूर शहर मध्यमधून शिवसेनेतर्फे 2019 ची विधानसभा निवडणूक लढविण्याची मी तयारी केली होती. ऐनवेळी माझी उमेदवारी कापण्यात आली. गेल्या काही दिवसापासून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर सोलापूर विमानतळावर मी त्यांची आवर्जून भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मला मुंबईला येऊन भेटण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या भेटीसाठी मी प्रयत्न केले; परंतु माझी भेट होऊ शकली नाही. मधले लोक व मध्यस्थ यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी भेट होऊ शकली नसल्याची खंत सोलापूर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी व्यक्त केली. 

 सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने राजकीय जुळवाजुळव सुरू केली आहे. एमआयएम नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता महेश कोठे यांच्या माध्यमातून बडा नेता उद्या राष्ट्रवादीमध्ये दाखल होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com