संजय राऊत म्हणतात...मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना! - Sanjay Raut Again Challeges Kangana Ranaut | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राऊत म्हणतात...मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 सप्टेंबर 2020

मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना...पहले भी कई तुफानोंका रुख मोड चुका हूँ...!असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपल्या विरोधकांना सुनावले आहे. 

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. कंगनाच्या या वक्तव्यावरुन राऊत यांनी तिने मुंबईत येऊच नये, असा सल्ला दिला होता. त्यावरुन कंगनाने राऊत आपल्याला उघड धमकी देत असल्याचा आरोप केला होता. त्यावरुनही राऊत यांच्यावर टीका झाली. राऊत यांनी आपल्या नव्या ट्वीटच्या माध्यमातून कंगना आणि आपल्याला विरोध करणाऱ्यांना इशारा दिला.

मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना...पहले भी कई तुफानोंका रुख मोड चुका हूँ...!असे म्हणत राऊत यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपल्या विरोधकांना सुनावले आहे. 

कंगना राणावतने स्वतःचं टि्वटर हॅडल स्वतःचं वापरावं, राजकीय पक्षाला स्वतःचं टि्वटर हॅडल चालवायला देऊ नये, असे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल भाजपला टोला लगावला होता. अभिनेत्री कंगना राणावतने ट्वीटरवर खेळण्यापेक्षा बाॅलीवूडमधील ड्रग माफियांबद्दल ट्वीटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे त्याबाबतचे पुरावे द्यावेत, असेही राऊत यांनी कंगनाला सुनावले होते.

दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्‍मीरशी केल्याने महाराष्ट्रातील अनेक सेलिब्रिटींनी आणि नेत्यांनी तिला लक्ष्य केले होते. अनेक कलाकारांनी कंगनाच्या भूमिकेला विरोध दर्शविला होता. शिवसेना आणि मनसेनेही कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला. तसेच तिला मुंबई आणि महाराष्ट्रात न थांबण्याचा सल्ला दिला होता. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही मुंबई पोलिसांवर विश्‍वास नाही त्यांना मुंबई व महाराष्ट्रात राहण्याचा हक्क नाही, असे म्हटले होते. त्यामुळे कंगना आता नरमली असून, तिने मुंबई ही माझी "यशोदा माता' आहे, असे म्हटले आहे.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख