...या साठी बच्चू कडूंनी व्यक्त केली दिलगिरी!

राज्यमंत्री बच्चू कडू यांना नागपुरात काही तास अडवून ठेवल्याने राज्यमंत्री बच्चू कडू हे काल मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका फेसबुकवर पोस्टद्वारे आज दिलगिरी व्यक्त केली आहे
Bacchu Kadu Apologized for not attending Morcha in Mumbai
Bacchu Kadu Apologized for not attending Morcha in Mumbai

अकोला : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात मंगळवारी मुंबई येथील अंबानीच्या कार्यालयावर स्वभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, कम्युनिस्ट पक्ष आदी पक्षांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी आधीच राज्यमंत्री बच्चू कडू यांना नागपुरात काही तास अडवून ठेवल्याने राज्यमंत्री बच्चू कडू हे या मोर्चात सहभागी होऊ शकले नाही. त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका फेसबुकवर पोस्टद्वारे आज दिलगिरी व्यक्त केली आहे.

''माझ्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदा मी आंदोलनाला पोहचू शकलो नाही. पोलीस प्रशासनाच्या गैरसमजामुळे माझे सकाळी ९चे फ्लाईट सुटले. त्यानंतर मी १२च्या फ्लाईटने आंदोलनाठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न केला. परंतु पोहचू शकलो नाही. याकरिता दिलगिरी व्यक्त करतो. या आंदोलनात महाराष्ट्रातून आलेले हजारो प्रहारचे कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनास मा. राजू शेट्टी, मा. जयंत पाटील, बाबा आढावजी, प्रतिभा ताई शिंदे, प्रहारचे बल्लु जवंजाळ व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार. आपण हे आंदोलन यशस्वी केले,'' असे बच्चू कडू यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे. 

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट कार्यालयावर काल अखिल भारतीस किसान संघर्ष समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार होता. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू निघाले होते. पण पोलिसांनी त्यांना नागपुरातच अडवले. 

सकाळी विमानतळावर जाण्यासाठी बाहेर निघालो असताना पोलिसांना आम्हाला थांबवले आणि आपल्याला येथून जाऊ न देण्याचे आदेश आहेत, असे सांगितले. माझे विमान सकाळी ९.११ वाजताचे होते, ते हूकले. मी आता फोनवरून माहिती घेत आहे, की थांबवण्याचे कारण काय? आजचा मोर्चा शांततेनेच होणार आहे. तरीसुद्धा अडवून ठेवण्यामागचे कारण कळले नाही. नेमके कोण अडवत आहे, याचा शोध घेत आहो. मी नाही गेलो तरी आजचे आंदोलन होणारच आहे, असे बच्चू कडू म्हणाले होते.  

मोर्चा नक्की निघेल. सर्व जण तेथे पोहोचले आहेत. आमचे कार्यकर्तेदेखील पोहोचले आहेत आणि मीसुद्धा मुंबईला पोहोचणारच आहे. अजून दोन विमान आहेत. तरीही अडवले तर मी माझ्या पद्धतीने पोहोचेनच, असेही बच्चू कडू म्हणाले होते. मात्र, मोर्चासाठी पोहोचता न आल्याने त्यांनी फेसबूक पोस्टद्वारे दिलगिरी व्यक्त केली. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com