चंद्रकांत पाटलांचा राजकीय प्रवास कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा  - Chandrakant Patil's political journey | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांत पाटलांचा राजकीय प्रवास कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 जून 2021

महापालिकेच्या शाळेत शिकलेला गिरणी कामगाराचा मुलगा देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला ते केवळ संघाचे विचार आणि कार्य प्रामाणिकपणे लोकांपर्यत पोचविण्याच्या कष्टामुळे

पुणे : मुंबईत गिरणी कामगारांच्या संपात वडिलांची गिरणीतील नोकरी गेली. अतिशय बिकट परिस्थितीत बीकॉम पूर्ण केले. नोकरीची अतिशय गरज असतानाही युको बँकेची चालून आलेल्या नोकरीचे पत्र फाडून टाकले ते केवळ राष्ट्रीय सवयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी. विद्यार्थी परिषदेचे सलग १३ वर्षे काम केले. या साऱ्या कामाची पावती पक्षाने दिली आणि २००४ मध्ये चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भारतीय जनता पार्टीचे (BJp) सचिव म्हणून राजकाणात प्रवेश केला. (Chandrakant Patil's political journey) 

आज पाटील यांचा वाढदिवस. गेल्या सात वर्षात राज्याच्या राजकारणात चंद्रकांत पाटलांचे नाव चर्चेत आहे. २०१४ ला राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदानंतर सर्वात महत्वाचे मानले जाणारे महसूलमंत्रीपद पाटील यांच्याकडे आले. सोबत कृषी-सहकारसारखी अर्धा डझन खाती त्यांच्याकडे होती. गेल्या पाच-सात वर्षातील चंद्रकांत पाटील बऱ्यापैकी माहीत आहेत. मात्र, वैयक्तिक आयुष्यात त्यांना आलेल्या अडचणी, केलेले कष्ट त्यानंतर संघ, विद्यार्थी परिषद व भाजपचे मनापासून केलेले काम असा त्यांचा चढता आलेख आहे.

हे ही वाचा : जितिन प्रसाद यांच्यावर मोठी जबाबदारी; योगींनी दिले संकेत

गरीबी काय असते. सामान्यांचे दु:ख काय असते हे जवळून अनुभवलेले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढल्याने सेवा ही संघटन मानणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाढदिवसानिमित्त जाहिरातबाजी न करता अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. महापालिकेच्या शाळेत शिकलेला गिरणी कामगाराचा मुलगा देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला ते केवळ संघाचे विचार आणि कार्य प्रामाणिकपणे लोकांपर्यत पोचविण्याच्या कष्टामुळे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटी तालुक्यातील खानापूर हे बावीसशे लोकसंख्येचे पाटील यांचे मूळ गाव. गिरणी कामगार म्हणून वडील बच्चू पाटील मुंबईत काम करीत होते. त्यामुळे साहजिकच पाटील यांचे बालपण मुंबईतच गेले. पहिली ते सातवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण मुंबई महापालिकेच्या शाळेत झाले. त्यानंतर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात (पूर्वची किंग जॉर्ज शाळा) झाले. पुढे सिद्धार्थ कॉलेजमधून त्यांनी बीकॉम पूर्ण केले. पाटील यांनी विद्यार्थी परिषदेचे सलग १३ वर्षे केलेले काम सर्वांच्या लक्षात आहे. 

हे ही वाचा :  केंद्रीय कृषिमंत्री शेतकऱ्यांशी चर्चेस तयार पण एका अटीवर...

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी कौन्सिलची निवडणूक, मुंबईतील विद्यार्थी परषदेचे अविस्मरणीय मोर्चा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री हे पाटील यांचे काम संघटनेच्या पातळीवर ऐतिहासिक आहे. स्वर्गीय प्रमोद महाजन, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यामुळे २००४ मध्ये पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाला. सुरवातीला प्रदेश चिटणीस नंतर सरचिटणीस पुढे उपाध्यक्ष व राज्यात भाजप सत्तेत असताना २०१९ साली थेट प्रदेशाध्यक्ष अशी पाटील यांची राजकीय चढण त्यांनी संघटनेसाठी केलेल्या कामाची पावती देणारी आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख