जयंतरावांनी फोडला शिवसेनेचा मातब्बर नेता; मुंबईत केला राष्ट्रवादीत प्रवेश 

महापौर निवडीच्या 'करेक्‍ट कार्यक्रमात' त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
Shiv Sena's Sangli leader Shekhar Mane joins NCP
Shiv Sena's Sangli leader Shekhar Mane joins NCP

सांगली : शिवसेना नेते, माजी नगरसेवक शेखर माने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेशाचा कार्यक्रम झाला. महापालिका निवडणुकीच्या आधी माने यांनी शिवबंधन हातात बांधले होते. आता त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत हातात घड्याळ बांधून घेतले आहे. महापौर निवडीच्या "करेक्‍ट कार्यक्रमात' त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. 

शेखर माने यांनी याआधी कॉंग्रेस व राष्ट्रवादीत दिवंगत नेते मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले. महापालिकेत ते दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी उपमहापौर, गटाचे नेते म्हणून त्यांनी काम पाहिले होते. या काळात पक्षाविना दबावगट स्थापन करण्याचा वेगळा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला होता. महापालिकेच्या स्थापनेपासून सांगलीच्या राजकारणात, समाजकारणात त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला त्यांचा फायदा होईल, महापौर निवडीत त्यांनी केलेले काम उपयुक्त ठरले, असे कौतुक जयंत पाटील यांनी या वेळी केले. 

गेल्या तीन वर्षांपासून ते शिवसेनेचे नेते म्हणून कार्यरत होते. शहरातील युवा मंडळाचे नेतृत्व करत त्यांनी युवकांची फळी बांधली आहे. त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने शिवसेनेला मात्र धक्का बसला आहे. शहरातील अनेक मंडळांचे युवक आणि शिवसेनेतील एक गटही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. 

सांगली शहराच्या विकासासाठी आजवर आम्ही राबलो आहे. आताही राष्ट्रवादीत प्रवेशामागे शहर विकासाचाच उद्देश आहे. शिवसेनेत कोणत्याही पदाविना मी कार्यरत राहिलो. तिथेही अपेक्षा केली नाही. राष्ट्रवादीतही शहरासाठी आवश्‍यक असलेली कामे व्हावीत, हीच अपेक्षा घेऊन आलो आहे, असे माजी नगरसेवक, शिवसेना नेते शेखर माने यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com