फडणवीसांच्या विरोधामुळे हुकलेली मंत्रिपदाची संधी क्षीरसागरांना ठाकरेंनी दिली 

कोल्हापूर शहराच्या विकासासाठी 5 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
Rajesh Kshirsagar elected as Executive Chairman of State Planning Board
Rajesh Kshirsagar elected as Executive Chairman of State Planning Board

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्र्यांचे अधिकार, सुरक्षा, कार्यालय, वाहन, कर्मचारी स्टाफ देण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी 5 कोटींचा निधी मंजूर केला आहे,अशी माहिती क्षीरसागर यांनी दिली. 

गेल्या पाच वर्षांत तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांची मंत्रीपदाची संधी हुकली. मात्र त्यांना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष पद मिळाले. या मंडळाकडे 10 हजार कोटींच्या निधीचे अधिकार आहेत. तसेच या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा आहे. राज्य सरकाने नियोजन मंडळ वगळता बहुतांशी महामंडळे बरखास्त केली. 

कोविडमुळे क्षीरसागर यांचे मुंबईमधील कार्यालय व अन्य अधिकार मिळणे थांबले होते. आज सरकारी आदेश काढून हे सर्व अधिकारी, मुंबई येथील कार्यालय, मुंबई येथे मलबार हिल येथील निवासस्थान, एक्‍स सुरक्षा, आवश्‍यक स्टाफ, स्वतंत्र शासकीय वाहन या सर्व बाबींती परिपूर्तता करण्यात आली. यानंतर क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

कोल्हापूर महापालिकेतील प्रलंबीत विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून 5 कोटींचा निधी मंजूर करून घेतला असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यातील भाजपचे नेते यांनी मंत्रिपदाला विरोध केला होता. त्यामुळे पाच वर्षांत झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची संधी हुकली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी विश्‍वास दाखवून राज्य नियोजन मंडळाचा कारभार हाती दिला, असे क्षीरसागरांनी म्हटले आहे. 

राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ. कोल्हापूर शहरातील प्रलंबित प्रश्‍न आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास गती देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करू. यामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com