Let's teach a lesson to sugar millers who don't pay full FRP: Raju Shetty
Let's teach a lesson to sugar millers who don't pay full FRP: Raju Shetty

यापूर्वी झाला नाही, असा धमाका करू : राजू शेट्टी

आम्ही पाच एप्रिल रोजी साखर आयुक्तालयात जाऊन साखर आयुक्तांकडून माहिती घेणार आहोत.

कराड : राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी उसाची संपूर्ण एफआरपी दिलेली नाही, त्यांची आरआरसी (कारखान्यांची मालमत्ता विकून उसाचे पैसे बिल देणे) करायला आम्ही तयार आहोत, असे आश्वासन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहे. येत्या 5 एप्रिलपर्यंत थकीत कारखान्यांची आरआरसी केली नाही, तर यापूर्वी झाला नाही, असा धमाका गनिमी काव्याने करून साखर कारखानदारांना वठणीवर आणू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. 25 मार्च) येथे दिला. 

थकित एफआरपी आणि वीज बिलासंदर्भात माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (ता. 25 मार्च) सह्याद्री कारखान्यावर आंदोलनाचा इशारा दिला होता. राजू शेट्टी हे कारखान्यावर पोचण्याच्या अगोदरच पोलिसांनी त्यांना महामार्गावर ताब्यात घेऊन कराडच्या शासकीय विश्राम ग्रहात आणले. त्या दरम्यान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात बैठक होऊन चर्चा झाली. त्यामध्ये झालेल्या चर्चेची माहिती देताना शेट्टी बोलत होते. 

शेट्टी म्हणाले, "सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी 1 एप्रिलला साखर आयुक्तालयात जाऊन साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपीची माहिती घेणार आहे, असे सांगितले. साखर कारखान्यांकडे 31 मार्च अखेर 2300 कोटी रुपये एफआरपी थकीत होती. आम्ही पाच एप्रिल रोजी साखर आयुक्तालयात जाऊन साखर आयुक्तांकडून माहिती घेणार आहोत; तोपर्यंत एफआरपी दिली गेली नाही तर यापूर्वी झाला नाही, असा धमाका करून साखर कारखानदारांना वठणीवर आणून साखर कारखानदारांना आंदोलनाच्या माध्यमातून धडा शिकवू.'' 


हेही वाचा : सहकारमंत्र्यांच्या कारखान्यावर आंदोलनासाठी निघालेल्या राजू शेट्टींना पोलिसांनी घेतले ताब्यात 

कऱ्हाड : "राज्यातील ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही, त्यांच्यावर आरआरसीची कारवाई केली जाते. त्यातून कारखान्यांकडील शिल्लक साखर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विकून त्यातून शेतकऱ्यांचे देणे भागवले जाते. अशा कारवाया साखर आयुक्तालयाकडून सुरूच आहे,'' अशी स्पष्टोक्ती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी (ता.25 मार्च) माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी बोलताना केली. 

साखर कारखान्यांकडील थकीत एफआरपी आणि वीजबील माफ करावी, या मागणीसाठी शेट्टी यांच्या उपस्थितीत आज (ता. 25 मार्च) सह्याद्री कारखान्यावर आंदोलन होणार होते. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी महामार्गावरून शेट्टी यांना येथील शासकीय विश्रामगृहात आणले. तेथे सहकारमंत्री पाटील व शेट्टी यांची याप्रश्नी चर्चा झाली. त्याची माहिती देताना सहकारमंत्री पाटील यांनी वरील उत्तर दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com