धनंजय महाडिक खोटारडे....२०१७ मध्ये कलेक्टर कार्यालयात काय बोलले होते? 

महाडिकांचा खोटा चेहरा जनतेसमोर आलाआहे.
Dhananjay Mahadik is a liar: Criticism of Satej Patil :
Dhananjay Mahadik is a liar: Criticism of Satej Patil :

कोल्हापूर : माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासारखं खोट बोलणारा माणूस या राजकारणात सापडणार नाही. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात 2017 मध्ये याच धनंजय महाडिक यांनी सांगितले होते की गोकुळमध्ये महाडिकांचा एकही टॅंकर नाही. आता गोकुळ निवडणुकीच्या प्रचारात त्यांचेच चुलते, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी ‘गोकुळमध्ये माझे 40 टॅंकर आहेत' असे जाहीर केले आहेत. त्यामुळे या महाडिकांचा खोटा चेहरा जनतेसमोर आला असल्याची टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. 

कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री सतेज पाटील बोलत होते.

ते  म्हणाले, धनजंय महाडिक किती खोटे बोलतात. याची भाषणे आहेत. वृत्तपत्रामध्येही मोठ्या हेडिंगमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. हा धडधडीत पुरावा आहे. दरम्यान, महादेवराव महाडिक यांनी आपले 40 टॅंकर गोकुळमध्ये असल्याचे जाहीर केले आहे. आता धनंजय महाडिक यांना उलट प्रश्‍न केला पाहिजे. धनंजय महाडिक 2017 मध्ये म्हणाले होते की गोकुळमध्ये आमचा एकही टॅंकर नाही. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि आता महादेवराव महाडिक यांनी ‘गोकुळमध्ये माझे 40 टॅंकर आहेत' अशा मान्य केलेली वृत्त एकत्रित वापरून त्यांचा खोटा चेहरा प्रसार माध्यमांनी जगासमोर आणला पाहिजे. एक वर्षापूर्वी 2 लाख 70 हजार मतांनी पराभव झालेला हा खोटा चेहरा जगासमोर आलाच असल्याची टीकाही पाटील यांनी केली. 
 
दोन नंबरवाल्यांनी आमच्याकडे  बोट दाखवू नये

दोन नंबरवाल्यांनी आमच्याकडे अभद्र युती म्हणून बोट दाखवण्याची गरज नाही. लोकांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही स्वत:चे टॅंकर वाचवण्यासाठी येथे आलेलो नाही. महाडिक टॅंकर वाचवण्यासाठी आलेले आहेत. वास्तविक महाडिक कंपनीही ईस्ट इंडिया कंपनीसारखी कोल्हापूरमध्ये आली आहे. त्यांनी एक-एक संस्था ताब्यात घेण्याचे काम केले. मात्र कोल्हापूरच्या जागरुक आणि स्वाभिमानी जनतेला आपले कोण आणि परके कोण याचा फरक कळतो.

दूध उत्पादकांच्या जीवावर एकच माणूस मोठा झाला 

पाच लाख 50 हजार दूध उत्पादकांच्या जीवावर एकच माणूस मोठा झाला आहे. त्या साडेपाच लाख लोकांनी दूध काढला, शेण-घाण काढली आणि घर मात्र एकाच माणसाचे भरले आहे. आता हे साडेपाच लाख लोक जागरुक झाले आहेत. आत हेच लोक महाडिक यांना मतदान नाही म्हणून सांगत आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com