वयाच्या पासष्टीनंतर मिळाला शिवसैनिकास लेखकाचा मान 

आजवर विपुल लिखाण केलेल्या दि. बा. यांच्या साहित्याची नोंद मुख्य प्रवाहाने घेतली नव्हती. अखेर वयाची पासष्टी पूर्ण झाल्यावर त्यांच्या लेखकपणावर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मान्यतेची मोहोर उठली आहे.
After the age of 65, Shiv Sainiks got the honor of author
After the age of 65, Shiv Sainiks got the honor of author

पुणे : सांगली जिल्ह्यातील कामेरीचे लेखक दि. बा. पाटील यांच्या "भली माणसं' या व्यक्तीचित्र संग्रहातील "बाबा मास्तर' या व्यक्तिरेखेचा समावेश शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. भाग तीनच्या अभ्यासक्रमात झाला आहे. दि. बा. पाटील यांनी शिवसेनेत शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख या पदावर काम केले आहे. राजकारणात सक्रिय असतानाही त्यांनी लिखाणाची आवड जोपासली.

आजवर विपुल लिखाण केलेल्या दि. बा. यांच्या साहित्याची नोंद मुख्य प्रवाहाने घेतली नव्हती. अखेर वयाची पासष्टी पूर्ण झाल्यावर त्यांच्या लेखकपणावर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मान्यतेची मोहोर उठली आहे. 

दि. बा. हे पहिलवान. पण पहिलवानकी करत असताना त्यांनी वाचनाची आवड जोपासली. याच दरम्यान ते लिहू लागले. आसपासच्या कथा सांगू लागले. लिखाण करत असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन ते शिवसेनेत गेले. शिवसैनिक ते उपजिल्हाप्रमुख या पदावर दि. बा. यांनी काम केले. त्यांची कारकीर्द वादळी ठरली. त्यांचा मोर्चा हा प्रशासनाच्या उरात धडकी भरवणारा होता. 

याच दरम्यान दि. बा. यांनी सिनेअभिनेते विलास रकटे यांच्या सहवासामुळे त्यांनी प्रतिकार या चित्रपटात भूमिकाही केली. दि. बा. पाटील जरी राजकारणात सक्रिय होते तरी त्यांच्यातील लेखक जागा होता. ते लिहीत होते. बघता बघता त्यांनी 11 कादंबऱ्या, 3 कथासंग्रह आणि 1 व्यक्तिचित्र संग्रह एवढे लिहून मराठीत वाळव्याची भाषा आणली. तो परिसर आणि त्या परिसराचे प्रश्न मांडले. लिहीत असतानाच ते साहित्य संमेलनाच्या स्टेजवरून आपली भूमिका मांडत राहिले. 

राजकारणात पूर्णवेळ सक्रिय असताना त्यांना निवडणुकीच्या रिंगणात यावे लागले. त्यांनी 2009 मध्ये शिराळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत विजयी होणे बिलकुल शक्‍य नव्हते, हे त्यांनाही माहिती होते. मात्र, पक्षाने आदेश दिला आणि पदरमोड करून निवडणूक लढवली,' असे दि. बा. सांगतात. 

राजकीय जीवनात दि. बा. यांची परवड झाली. संवेदनशील माणसाचे राजकारण नसते, हे कळायला दि. बा. यांना ज्येष्ठत्व आले. मग त्यांनी शिवसेना सोडली आणि नव्या दमाने लिखाण करू लागले. लिहिणाऱ्या पोरांना मार्गदर्शन करू लागले. त्यांच्या कसदार लिखाणालाही योग्य तो न्याय मिळाला नव्हता. मात्र, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांचा "बाबा मास्तर' अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. किमान हा आनंदाचा क्षण एका प्रतिभावंत लेखकाला समाधान देईल. राज्य सरकारने दिलेला एक पुरस्काराचा अपवाद सोडता दि. बा. यांच्या वाट्याला सरकारकडून उपेक्षाच आली आहे. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com