हर्षवर्धन पाटील यांनी सुशीलकुमार शिंदेंकडे केली ही मागणी - Sushilkumar Shinde should recommend to Congress leadership for Ratnakar Mahajan's Rajya Sabha : Harshvardhan Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

हर्षवर्धन पाटील यांनी सुशीलकुमार शिंदेंकडे केली ही मागणी

मधुकर गलांडे
मंगळवार, 29 जून 2021

इंदापूर तालुक्यातील सुपुत्राला राज्यसभेवर पाठवावे.

इंदापूर : रत्नाकर महाजन एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व व सुसंस्कृत विचाराचे स्पष्ट वक्ते आहेत. त्यांचे एक वैशिष्ट्य आहे, जिथे असतील तिथे प्रामाणिकपणे काम करायचे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. हल्ली काही माणसे सकाळी एकाकडे, तर दुपारी दुसरीकडेच असतात. महाजन यांनी राज्यातील सर्व महत्त्वाची पदे भूषविली आहेत, त्यांना आता राज्यसभेवर पाठवण्याची गरज आहे. ती शिफारस ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी करावी. इंदापूर तालुक्यातील सुपुत्राला राज्यसभेवर पाठवावे, असे आवाहन राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. (Sushilkumar Shinde should recommend to Congress leadership for Ratnakar Mahajan's Rajya Sabha : Harshvardhan Patil)

राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होते. मुंबई वृत्तपत्र संघ व राधिका सेवा संस्था यांच्या वतीने त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा : काँग्रेसने साथ सोडताच राजेंद्र शिंगणेंचा बच्चू कडूंना फोन 

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या आवाहनाला उत्तर देताना सुशीलकुमार शिंदे यांनी म्हणाले की रत्नाकर महाजन हे आज आम्हाला हवे आहेत. माझे जिथं कुठे चालेल, त्या ठिकाणी महाजन यांच्या राज्यसभा सदस्यत्वासाठी शब्द टाकेन. त्याबाबत तुम्ही निर्धास्त राहा. आजकाल शब्दाला किती किंमत आहे, हे मलाही माहिती नाही. पण, ती एकेकाळी होती. 

शंकरराव बाजीराव पाटील असताना राज्यसत्तेत काय किंमत होती, ते आम्हाला माहिती आहे. त्यावेळी शिबिराला तुम्ही नव्हता. आम्हीसुद्धा वही-पेन घेऊन जायचो. ती एक काँग्रेसची विचारांची, शिबिरांची परंपरा होती. ती सध्या राहिलेली नाही, याचे आम्हाला दुःख होतंय. शिबिराची आणि विचाराची परंपरा सध्या राहिली नसल्याने आम्ही सध्या कुठे आहोत, हे पाहणे कठीण झालेले आहे. आमची ध्येय धोरणं चुकीची असली तरी ती बरोबर करण्यासाठी विचारांच्या शिबिराची गरज आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी काँग्रेस पक्षातील सध्याच्या त्रुटीवर बोट ठेवले.

शिंदे म्हणाले की काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रत्नाकर महाजन. इंदापूरकरांनी महाराष्ट्राला दिलेले सर्वोत्तम रत्न म्हणजे रत्नाकर महाजन. महाजन यांचे भाषण व शिबिरातील वैचारिक भूमिका आजच्या घडीला खूप महत्त्वाची आहे. महाजन हे सुरुवातीपासूनच राष्ट्र संघात मध्येकार्यरत होते. युवक क्रांती दलामध्ये त्यांनी काम केले आहे. आणीबाणीच्या काळात काँग्रेसबरोबर मतभेद झाले; परंतु त्यांनी आपली काँग्रेस पक्षावरील निष्ठा कायम ठेवत पक्षाचे विचार जपत पुन्हा एकदा काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख