Seeing the growing opposition to Ujani water, Sanjay Shinde changed his role : Narayan Patil
Seeing the growing opposition to Ujani water, Sanjay Shinde changed his role : Narayan Patil

उजनीच्या पाण्याबाबत वाढता विरोध पाहून संजय शिंदेंनी घूमजाव करत भूमिका बदलली 

आमदार संजय शिंदेयांच्या दुहेरी भूमिकेचे दर्शन मात्र संपूर्ण सोलापूरजिल्ह्यास झाले.

सोलापूर : इंदापूर नियोजित उपसा सिंचन योजनेस उजनीतून (Ujani ) पाणी न देण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. पण यातून करमाळा मतदार संघाचे आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्या दुहेरी भूमिकेचे दर्शन मात्र संपूर्ण सोलापूर (Solapur) जिल्ह्यास झाले. मेणबत्ती दोन्ही बाजूंनी पेटवण्याचा आमदार शिंदे यांचा हा प्रयत्न झाकून राहीला नाही. मुळात इंदापूरच्या नियोजित प्रकल्पास प्राथमिक मान्यता ही अलिकडच्या कालावधीतच मिळाली. त्यासाठी पाणी राखून ठेवण्याचा निर्णयही पाटबंधारे विभागाने घेतला. सोलापूर जिल्हा आणि विशेष करून करमाळा ( Karmala) मतदार संघासाठी नुकसासनकारक असा निर्णय विद्यमान आमदारांना विचारात घेऊनच झाला. त्यास आमदार शिंदे यांनी मूकसंमती दिली. पण, त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील तीव्र संताप व नाराजीचे सूर पाहून शिंदे यांनी घूमजाव करत आपली भूमिका बदलली, अशी घाणाघाती टीका शिवसेनेचे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी केली. (Seeing the growing opposition to Ujani water, Sanjay Shinde changed his role : Narayan Patil)

इंदापूरच्या पाणी देण्याचा निर्णय सामूहिक रेट्यामुळेच रद्द करावा लागला. मात्र, आमदार संजय शिंदे स्वतःला श्रेय घेत असल्याबद्दल माजी आमदार पाटील यांनी शिंदे यांच्यावर निशाणा सधला आहे. नारायण पाटील म्हणाले, स्वतःला जिल्ह्याचे नेते म्हणून घेणारे संजय शिंदे हे आता तरी मंत्रालयीन पातळीवर तरी दक्षता बाळगून असे वादग्रस्त प्रकल्प कागदावर मंजुरीस येण्याअगोदरच त्यास विरोध करतील. करमाळा तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाहीत, असा मार्मिक टोलाही पाटील यांनी लगावला.

उजनीतून इंदापूरसाठी नियोजित पाणीवाटप आदेश तोंडी रद्द करुन सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. आता याबाबतच्या लेखी आदेशाबाबत लवकर कार्यवाही केली जावी. सरकारकडून जोपर्यंत लेखी स्वरूपात हा इंदापूर पाणी वाटपाचा आदेश रद्द होत नाही, तोपर्यंत आपण मराठवाड्यास पाणी न देण्याच्या व करमाळा तालुक्यातील या योजनेचे काम बंद पाडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काल इंदापूरसाठी उजनीतून पाणी दिले जाणार नसल्याचे सांगितले खरे. पण, यावर आंदोलक पूर्णपणे समाधानी नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पक्ष, विविध संघटना यांच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. यामुळेच राज्य सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले. यामुळे हे सामूहिक विरोधास आलेले यश आहे.  उजनी पाणीवाटपाबाबत आता करमाळा तालुक्यास हक्काचे पाणी व उजनी धरणग्रस्त गावांना मुलभुत नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी आपला लढा असाच पुढे चालू राहणार आहे.

इंदापूर नियोजित उपसा सिंचन योजनेचे संकट तुर्तास टळले असले तरी कृष्णा मराठवाडा प्रकल्पास प्रमाणापेक्षा तीन टिएमसी पाणी अधिक देण्याचा जो निर्णय पाठीमागे पाटबंधारे विभागाकडून घेतला गेला आहे, तो निर्णय हा प्रकल्प सुरु होण्यापूर्वी दुरुस्त करावा, यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करणार आहोतच. उजनीतील पाण्याबाबत आता सोलापूर जिल्ह्यातील जनता सावध असून जनरेट्यामुळेच प्रशासन बॅकफुटवर गेल्याचे दिसून आले. या प्रश्नाचे राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यावा, असे आवाहन नारायण पाटील यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com