रणजितदादांच्या १०५ वर्षे वयाच्या लढाऊ आजीने हरवले कोरोनाला

आजींचं असणेच आमच्यासाठी खूप काही आहे.
Ranjit Singh Mohite Patil's grandmother successfully defeated Corona
Ranjit Singh Mohite Patil's grandmother successfully defeated Corona

पुणे : आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या १०५ वर्षांच्या आजी श्रीमती कमलादेवी आप्पासाहेब माने (भीम बहादूर सरकार) (वय १०५) यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर १५ दिवसांत कोरोनाला हरवले आहे. सध्या त्या ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या असून योग्य उपचार मिळाले तर आपण कोरोनाला परतवून लावू शकतो, असा संदेश कमलादेवी माने यांनी आपल्या लढाऊ बाण्यातून दिला आहे. (Ranjit Singh Mohite Patil's grandmother successfully defeated Corona)

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपल्या आजीच्या लढाऊ बाण्याची माहिती दिली आहे. श्रीमती कमलादेवी माने ह्या रणजितदादांच्या आईच्या आई आहेत. पोस्टमध्ये रणजितदादांनी म्हटले आहे की, माझ्या १०५ वर्षांच्या आजीने कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. चार मुली, ३ मुलगे, १६ नातवंडे व २१ परतवंडे असा आजींचा जंबो परिवार आहे. त्यातील काहीजण राजकीय आणि प्रशासकीय पदांवरही कार्यरत आहेत.

हात पाय थकलेले,
काठी आजीचा आधार...
आजी सांभाळते सारा,
घरीदारी कारभार.....

अशा शब्दांत रणजितदादांनी आपल्या आजीच्या धैर्य आणि चिकाटीचे वर्णन केले आहे. 

रणजितदादांचे आजोळ हे कर्नाटकातील कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील मांगूर हे गाव. माझ्या आईची आई श्रीमती कमलादेवी माने (भीम बहादूर सरकार) ह्या १०५ वर्षांच्या आहेत. सुमारे १५ दिवसांपूर्वी आजींना तब्येतीचा किरकोळ त्रास जाणवू लागल्यामुळे उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. उपचारांना प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आजीने उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे त्या १५ दिवसांत कोरोनातून ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत, असे मोहिते पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

वयाच्या १०५ व्या वर्षीही आजींची स्मरणशक्ती आणि प्रकृती ठणठणीत आहे. जुन्या काळातील प्लेगसह इतर साथीच्या आजाराबाबतच्या आठवणी त्या स्पष्टपणे सांगत असतात. कुटुंबातील सर्वांसाठीच त्या मार्गदर्शक, आधारवड आहेत. दररोज वृत्तपत्रांचे वाचन, चालण्याचा व्यायाम त्या अखंडपणे करत असतात. कोरोनाला न घाबरता वैद्यकीय उपचारांना योग्य प्रतिसाद व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याच्यावर आपण मात करू शकतो, असा संदेश माझी आजी कमलादेवी माने यांनी आपल्या सर्वाना दिला आहे.

आजींचं असणेच आमच्यासाठी खूप काही आहे, अशी भावनाही नातू रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आजीबद्दल व्यक्त केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com