राजेंद्र राऊत म्हणतात, ‘सोलापूरवर अन्याय होतोय; कलेक्टर ऑफिससमोर उपोषण करणार’ - Rajendra Raut along with BJP MPs and MLAs from Solapur will agitation in front of Collector's office | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

राजेंद्र राऊत म्हणतात, ‘सोलापूरवर अन्याय होतोय; कलेक्टर ऑफिससमोर उपोषण करणार’

प्रशांत काळे
मंगळवार, 11 मे 2021

त्यांच्या जिल्ह्यास झुकते माप देऊन सोलापूर जिल्ह्याचाही कोटाही इतर जिल्ह्यांना दिला जात आहे.

बार्शी  (जि. सोलापूर)  ः केंद्र व राज्य सरकारमार्फत (Center and state government) रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सीजन पुरवठा व कोविड लसींचा पुरवठा पुणे विभागातील (Pune Division) जिल्ह्यांना केला जात आहे. पण सोलापूर (Solapur) जिल्ह्याला सापत्न वागणूक देऊन रुग्णांच्या संख्येनुसार इंजेक्शन, ऑक्सिजन, लशींचा पुरवठा होत नाही, याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) खासदार (MP) व आमदार (MLA) येत्या गुरुवारी (ता. १३ मे) सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत, अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) यांनी दिली. (Rajendra Raut along with BJP MPs and MLAs from Solapur will agitation in front of Collector's office)
    
पुणे विभागासाठी  ता.12 एप्रिल 2021 ते 10 मे 2021 या कालावधीत  केंद्र व राज्य सरकार यांच्याकडून रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन व कोवीड लस पुरवठा करताना पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होत आहे. सोलापूर जिल्ह्याला रुग्णांच्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिली जात नाहीत, ऑक्सिजनचा पुरवठा अद्यापी सुरळीत केला जात नाही, कोविड लस ही लोकसंख्येच्या प्रमाणात दिली जात नाही, टेस्ट किटचा पुरवठा जिल्ह्याला कमी प्रमाणात केला जातो.
  
हेही वाचा : नातेवाइकांनी फोडलेला हंबरडा ऐकून अंत्यसंस्काराची तयारी चालवलेल्या आजीने डोळे उघडले 

याउलट पुणे विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याचे मंत्री आहेत, त्यांच्या जिल्ह्यास झुकते माप देऊन सोलापूर जिल्ह्याचाही कोटाही इतर जिल्ह्यांना दिला जात आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्या वाढत आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूदरांमध्ये झालेला आहे.

 
यापूर्वी वेळोवेळी आम्ही प्रशासनामधील संबंधित अधिकाऱ्यांना पाठपुरावा करूनही कोणतीही पूर्तता केली जात नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्ही जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे व भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील सर्वजण मिळून गुरुवारी (ता. 13 मे)  सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याची माहिती आमदार राऊत यांनी दिली.
  
उपोषणाबाबत आमदार राजेंद्र राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना ई-मेलद्वारे पत्र पाठविले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख