जिल्ह्याचे नेते म्हणवून घेणाऱ्या संजय शिंदेंनी व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करावेत : सेनेच्या सभापतींची बोचरी टीका

याकडे लोकप्रतिनिधी असलेले शिंदे यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.
MLA Sanjay Shinde should provide ventilator beds to Kovid Center in karmala taluka : Nanvare
MLA Sanjay Shinde should provide ventilator beds to Kovid Center in karmala taluka : Nanvare

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा (karmala) तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. स्वतःला जिल्ह्याचे नेते म्हणवून घेणारे तालुक्याचे आमदार संजय शिंदे (MLA Sanjay Shinde) यांनी नुसत्या कोविड सेंटरला भेटी देण्यापेक्षा करमाळा तालुक्यात व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन शिवसेनेचे पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे (Gahininath Nanavare) यांनी केले. (MLA Sanjay Shinde should provide ventilator beds to Kovid Center in karmala taluka : Nanvare)

याबाबत बोलताना सभापती गहिनीनाथ ननवरे म्हणाले, करमाळा तालुक्यात दररोज 200 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. तालुक्यात ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा व ऑक्सिजनचे अपुरे बेड आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी तालुक्याबाहेर नगर, पुणे, सोलापूर, अकलूज, इंदापूर ,बार्शी अशा ठिकाणी जावे लागत आहे.

कोविड हॉस्पिटल्समध्ये मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य पद्धतीने बिलाची वसुली सुरू आहे. रेमडेसिव्हिरचा काळाबाजार सुरू आहे. याकडे लोकप्रतिनिधी असलेले शिंदे यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. केवळ सोशल मीडियात कोविड सेंटरच्या भेटीचे फोटो टाकून तालुक्याचा कळवळा दाखवण्यापेक्षा आणि सुरू असलेल्या कोविड सेंटरला भेटी देण्यापेक्षा तालुक्याला रेमडेसिव्हिर इंजेक्शन, कोविड लस, ऑक्सिजन व इतर गोष्टींची पूर्तता कशी होईल, याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे करमाळा तालुक्यात एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही, त्यामुळे जेव्हा कोरोना रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल 70 पेक्षा खाली येते, तेव्हा त्याला व्हेंटिलेटर बेडची अत्यंत आवश्यकता असते. अशावेळी अचानक कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांची तारांबळ उडते. केवळ व्हेंटिलेटर बेड मिळाले नाहीत; म्हणून आत्तापर्यंत तालुक्यात 20 पेक्षा जास्त कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ही बाब गांभीर्याने घेण्याची असून याकडे लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

केवळ सोशल मिडीयातून कोरोना रुग्णांसाठी आपण मदत करत असल्याचे भासवून काहीही उपयोग होणार नाही, असा टोलाही ननवरे यांनी आमदार संजय शिंदेंना लगावला आहे.

तुम्ही स्वतःला जिल्ह्याचे नेते म्हणून घेता, सरकारदरबारी आपले वजन असल्याचे अनेकवेळा लोकांना सांगता, आपले जे काही सरकार दरबारी वजन आहे, ते सर्व वजन वापरून तालुक्यातील कोरोनाबाधितांना जीवदान देण्याचे काम आपण करावे. राजकारण करायच्या वेळी जरूर आपण राजकारण करू. मात्र, कोरोना कालावधीत तरी आपण राजकारण बाजूला ठेवून सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही ननवरे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com