मी अपक्ष आमदार; लवकरच शरद पवारांना भेटणार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा शेतकरीवर्ग बार्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे.
I Will meet Sharad Pawar for Barshi taluka's development fund : MLA Rajendra Raut :
I Will meet Sharad Pawar for Barshi taluka's development fund : MLA Rajendra Raut :

बार्शी (जि. सोलापूर) : बार्शी तालुक्याची उपसा सिंचन योजना, शासकीय औद्योगिक वसाहत मंजूर होऊन 25 वर्षे होऊन गेली तरी अद्याप कामे रखडली आहेत. ह्या योजनांना निधीची कमतरता भासत असून मी अपक्ष आमदार आहे. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली असून लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे, अशी माहिती बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. (I Will meet Sharad Pawar for Barshi taluka's development fund : MLA Rajendra Raut)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा शेतकरीवर्ग बार्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी बार्शी तालुक्यासाठी रखडलेल्या योजनांना निधी द्यावा. त्यांच्याकडून तालुक्याला ढळते माप मिळवण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचे आमदार राऊत यांनी या वेळी सांगितले.

बार्शी तालुक्यासाठी 1995-96 मध्ये उपसा सिंचन योजना, शासकीय औद्योगिक वसाहत ह्या दोन्ही योजना मंजूर झाल्या आहेत. पण, विरोधक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केलेला नाही. शासकीय औद्योगिक वसाहत होण्यास माजी मंत्री दिलीप सोपल यांचा प्रखर विरोध होता. तालुक्यात खासगी तीन औद्योगिक वसाहती कार्यरत असून त्यांचे बंधू अध्यक्ष आहेत. शासकीय औद्योगिक वसाहत झाली तर महत्व कमी होईल, यामुळे त्यांनी प्रयत्न केला नाही, असा आरोपही आमदार राऊत यांनी माजी मंत्री सोपल यांच्यावर केला.

तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून 2009 मध्ये लोकप्रतिनिधी असताना 135 एकर क्षेत्र भूसंपादन केले आहे. त्याचवेळी तीन कोटी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना दिला होता. हा प्रश्न पुन्हा खासदार ओमराजे निंबाळकर आणि मी हातात घेतला असून वीज उपकेंद्र व पाण्याची व्यवस्था केली आहे, असेही राजेंद्र राऊत म्हणाले.

पर्यटनस्थळ योजनेतून भक्त निवास, बार्शी नगरपरिषद इमारत, पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर, वैराग ग्रामीण प्रशिक्षण केंद्र अशा तालुक्याच्या विकास कामांसाठी पवारसाहेबांची भेट घेणार आहे. विकास कामांत विरोधकांनी खो घालू नये. विकासासाठी सोबत राहावे. कोरोना कालावधीतही सरकारने 25 कोटींचा निधी बार्शीसाठी दिला, असे आमदार राऊत यांनी या वेळी सांगितले.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रणवीर राऊत, पंचायत समितीच सभापती अनिल डिसले, संचालक रावसाहेब मनगिरे, वसुदेव गायकवाड, झुंबर जाधव या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

राजेंद्र मिरगणे यांना टोला

माजी मंत्री दिलीप सोपल हेच माझे विरोधक आहेत. आम्हा दोघांची हयात राजकारणात गेली आहे. पण, दिलीप सोपल यांचे बोट धरुन राजकारणात येण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असा अप्रत्यक्ष टोला आमदार राऊत यांनी राजेंद्र मिरगणे यांना नाव न घेता लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com