माजी सभापती मंगलदास बांदलांचा सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम

बांदल हे शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल १३ दिवस पोलिस कोठडीत राहणारे पहिले संशयित आरोपी ठरले आहेत.
Former Sabhapati Mangaldas Bandal remanded in police custody till Monday
Former Sabhapati Mangaldas Bandal remanded in police custody till Monday

शिक्रापूर (जि. पुणे)  ः पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना आज (ता. ५ जून) शिरूर न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. ७ जून) पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे बांदलांचा पोलिस कोठडीतील मुक्काम सोमवारपर्यंत तब्बल १३ दिवसांचा होणार आहे. (Former Sabhapati Mangaldas Bandal remanded in police custody till Monday)

मंदार पवार विरुध्द कृष्णा विरोळे यांच्या (तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) फसवणूक प्रकरणात ३ जून रोजी न्यायालयीन कोठडी सुनावत आली होती. त्यामुळे त्यांची रवानगी येरवड्यात होऊन ते कदचित जामिनास पात्र ठरले असते. मात्र, रवींद्र सातपूते यांच्या नव्या फिर्यादीमुळे बांदलांचा पोलिस कोठडीतील मुक्काम तब्बल चार दिवसांनी वाढला. बांदल हे शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल १३ दिवस पोलिस कोठडीत राहणारे पहिले संशयित आरोपी ठरले आहेत. 

पाणी चोरीच्या गुन्ह्यात तीन आठवड्यांपूर्वी अटकपूर्व जामीन मिळवून शिक्रापूर पोलिसांच्या हाती लागायचे नाही, याची कायदेशीर दक्षता बांदलांनी घेतली होती. मात्र त्यांचा हाच कायदेशीर डाव शिक्रापूर पोलिसांनी पद्धतशीरपणे हाणून पाडीत त्यांना दत्तात्रेय मांढरे यांच्या फसवणुकीच्या एका गुन्ह्यात पोलिस ठाण्यातच अटक केली. सगलपणे दुसऱ्या गुन्ह्यात त्यांना अटक झाली. बांदल यातून सुटतील, असे वाटत असतानाच त्यांना शिरुर न्यायालयाने १ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

याच दरम्यान ३१ मे रोजी रात्री त्यांच्यावर मंदार पवार यांची शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत बोगस कागदपत्रे सादर केल्यावरुन कृष्णा विरोळेंनी केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात थेट बॅंकेच्या तक्रारीवरुनच बांदल पुन्हा गुन्ह्यात अडकले आणि त्यांना तीन जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. याच दरम्यान त्यांच्या विरोधात रवींद्र सातपुते (जातेगाव बुद्रूक, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिल्याने त्यांना आज (ता. ५ जून) शिरुर न्यायालयात हजर करताच न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (ता. ७ जून) पुन्हा पोलिस कोठडी सुनावली. 

अशा पद्धतीने बांदलांचा पोलिस कोठडीतील मुक्काम सोमवारी १३ दिवसांचा होणार आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या इतिहासात तब्बल १३ दिवस पोलिस कोठडीत राहणारे बांदल हे पहिले आरोपी ठरले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com