माजी मंत्री दिलीप सोपलांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

त्याचबरोबर मानसिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
Former Minister Dilip Sopal met the District Collector of Solapur
Former Minister Dilip Sopal met the District Collector of Solapur

बार्शी (जि. सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर आणि तालुक्‍यात अनेक दिवसांपासून लॉकडाउन सुरु आहे. सामान्य, मोलमजूर, कामगार यांची अवस्था बिकट झाली असून व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प असल्याने त्यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. अत्यावश्‍यक सेवेसह इतर दुकानेही उघडावीत, अशी मागणी घेऊन माजी मंत्री दिलीप सोपल यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली. (Former Minister Dilip Sopal met the District Collector of Solapur)

माजी मंत्री दिलीप सोपल यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे, राजेंद्र मिरगणे, नागेश अक्कलकोटे, अरुण कापसे उपस्थित होते. माजी मंत्री सोपल म्हणाले की, प्रदीर्घ कालावधीच्या लॉकडाउनने सर्वांचे कंबरडे मोडले आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अनेकांना आर्थिक आणि त्याचबरोबर मानसिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

या पार्श्वभूमीवर अत्यावश्‍यक सेवांसोबत आवश्‍यक दुकानेदेखील नियम घालून उघडण्यात यावीत. व्यापारी व त्यावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अवलंबून अनेकांच्या सहनशीलता संपलेल्या आहेत. सुदैवाने बार्शीचा कोरोना संसर्गाच्या टक्केवारीचा आलेख खालावत आहे, असेही सोपल यांनी नमूद केले.

मिरगणे म्हणाले की, स्थानिक पातळीवर कोरोना काळात प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून पक्षपाती कारवाया होऊ नयेत, याची काळजी घेण्यासाठी आदेश देण्यात यावेत. नागेश अक्कलकोटे यांनी यावेळी लसीकरणचा वेग वाढवणे, अधिक केंद्र सुरू करणे, तपासणी किट जास्त देणे आदी मुद्दे उपस्थित केले. राज्य सरकारने तीन तासांत दोन कोटी रूपये ऑक्‍सिजन प्लांटसाठी देऊनही नगरपालिका प्लांट उभा करण्यात दिरंगाई करत असल्याच मुद्दाही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी या सर्व गोष्टींचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देत इतर दुकानांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे धोरण असून तसा निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com