भरणेंचे पालकमंत्रिपद घालविण्याचा प्रयत्न करणारांचा होणार 'करेक्ट कार्यक्रम'

पालकमंत्री हटावबद्दल या बैठकीत एका शब्दानेही चर्चा झाली नाही.
Dattatreya Bharane's Guardian Ministeryship safe; There will be a big change in Solapur NCP
Dattatreya Bharane's Guardian Ministeryship safe; There will be a big change in Solapur NCP

सोलापूर : सोलापूरच्या पालकमंत्रिपदावरून दत्तात्रेय भरणे यांना हटवा अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती. पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या बैठकीत सोलापूरच्या पालकमंत्रिपदी भरणे यांनाच कायम ठेवण्याचे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. पालकमंत्री हटाओबद्दल या बैठकीत एका शब्दानेही चर्चा झाली नाही. उलट सोलापूर जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या ११ तालुका पंचायत समित्या, महानगर पालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्याची सूचना राष्ट्रवादीने पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना केली आहे. त्यातून येत्या आठ दिवसांत पक्षसंघटनेत मोठे बदल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Dattatreya Bharane's Guardian Ministeryship safe; There will be a big change in Solapur NCP)

दरम्यान, एकीकडे भरणे यांच्या पालकमंत्रीला पदाला श्रेष्ठींनी अभय देत त्यांच्या विरोधात मोहिम राबविणाऱ्या पदाधिकाऱ्यांना एक प्रकारे सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे. त्यामुळे भरणे हटवा मोहिम राबविणाऱ्या नेत्यांचे पद गेल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे.

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता सात रस्ता येथील नियोजन भवनात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्ह्यातील कोरोना स्थिती, विकास कामाची त्यांनी माहिती दिली. पुण्यात झालेल्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक बदल केले जाणार असल्याचे ठरले असल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरच सोलापूर राष्ट्रवादीत अनेकांना नवीन जबाबदारी दिली जाणार आहे. येत्या आठ दिवसांमध्ये ही जबाबदारी संबंधितांवर सोपवली जाईल, असेही भरणे यांनी सांगितले.

 
सोलापूर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक महेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असून महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी त्यांना सहकार्य करा, अशा सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महेश कोठे यांच्या बद्दल विचारले असता पालकमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले की, महेश कोठे हे उत्तम संघटक आहेत. त्यांच्या संघटन कौशल्याचा सोलापूर राष्ट्रवादीला महापालिका निवडणुकीत नक्कीच फायदा होईल.

सोलापूरसाठी जे जे चांगले आहे, ते ते करावे

इंदापूरच्या 22 गावांना उजनी धरणातून पाणी देण्याचा आदेश रद्द झाल्यानंतर पालकमंत्री प्रथमच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. भरणे हे आज पंढरपूर येथेही गेले होते. त्या ठिकाणी व नियोजन भवनात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कृष्णा-भीमा स्थिरीकरणबाबत त्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भाष्य केले. सोलापूर जिल्ह्यासाठी जे जे काही चांगले आहे ते करावे, असे सांगत कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना राबविण्याची मागणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com