आंधळकरांना धक्का लावाल, तर जीवंत सोडणार नाही : बार्शीचे आमदार राऊतांना धमकी 

तुम्हाला मुंबईतून बाहेर पडू देणार नाही. कारण, माझे खूप भाई लोकांशी संबंध आहेत.
Barshi MLA Rajendra Raut receives death threats
Barshi MLA Rajendra Raut receives death threats

बार्शी (जि. सोलापूर) : बार्शी तालुक्‍याचे आमदार राजेंद्र राऊत आणि नगरसेवक अमोल चव्हाण यांना उद्देशून सोशल मीडियावर लाईव्ह करुन एकाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नंदू ऊर्फ बाबा पाटील (रा. पनवेल) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद प्रशांत खराडे (रा. शिवाजी आखाडा, बार्शी) यांनी दिली आहे. ही घटना 3 मार्च रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली. 

खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तीन मार्च रोजी सोशल मीडियावर सायंकाळी सहाच्या दरम्यान आमदार राजेंद्र राऊत व नगरसेवक अमोल चव्हाण यांना उद्देशून, "मी खूप हरामी माणूस आहे. माझ्या या दाढीच्या चेहऱ्यामागे जो चेहरा आहे, ते खूप कमी लोक ओळखतात. तुम्ही जर मुंबईला आलेले समजले, तर तुम्हाला मुंबईतून बाहेर पडू देणार नाही. कारण, माझे खूप भाई लोकांशी संबंध आहेत. भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात आपण राजकारण कराल व त्यांच्या केसाला धक्का लावाल, तर गाठ माझ्याशी आहे, मी तुम्हाला जीवंत सोडणार नाही.' 

"तुम्हाला ओपन चॅलेंज करतो. मी बार्शीत येऊन नंग्या तलवारी नाचवीन. तुम्हाला हे करताना माझ्या विरोधात किती पोलिस यंत्रणा, तुमच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा लावली तरी याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. तुमच्या सोबत दहा पोलिस ठेवले तरी त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. असे म्हणून तलावारीने मारण्याची भाषा करून धमकी दिली आहे,' असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक श्‍यामराव गव्हाणे तपास करीत आहेत . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com