दिलीप सोपलांनी मध्यरात्री एक वाजता बेड मिळवून दिलेल्या ८४ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

दुसरीकडेव्हेंटिलेटरचा बेड मिळणे कठीण झाले होते.
In Barshi, the 84-year-old grandfather successfully defeated Corona
In Barshi, the 84-year-old grandfather successfully defeated Corona

मळेगाव (जि. सोलापूर) : कोरोना (Corona) रुग्णाचा एचआरसिटीचा स्कोअर सतरा, तर ऑक्सिजन लेवल ऐंशीच्या खाली आल्याने त्यांना श्वास घेणेही मुश्कील झालेले....एकीकडे पेशंटची गंभीर स्थिती...दुसरीकडे शोधूनही व्हेंटिलेटरचा बेड मिळेना....रुग्णाची परिस्थिती खालावत चालल्याने नातेवाइकही बैचेन झालेले.... त्यातील एका नातेवाइकाने माजी आमदार दिलीप सोपल (Former MLA Dilip Sopal) यांच्याशी मध्यरात्री एकच्या सुमारास संपर्क साधला... रुग्णाची परिस्थिती ऐकून सोपलांनी तातडीने बेड उपलब्ध करून दिला...आणि बायपॅप व्हेंटिलेटरवर (Ventilator) उपचार सुरू झाले... शुगर आणि श्वसनाचा त्रास असूनही ८४ वर्षाच्या रुग्णाने प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अवघ्या पंधरा दिवसांत कोरोनाला हरवले. (In Barshi, the 84-year-old grandfather successfully defeated Corona)

शहाजी लिंबा सुतार (वय 84, रा. पिंपरी (सा), ता. बार्शी, जि. सोलापूर) असे कोरोनावर वयाच्या ८४ व्या यशस्वीपणे मात केलेल्या आजोबांचे नाव आहे. शहाजी सुतार यांना सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी बार्शी येथील एका दवाखान्यात नेण्यात आले होते. तेथे त्यांची कोविडची चाचणी केली असता त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. 

सुतार यांचा एचआरसिटीचा स्कोअर सतरा, तर ऑक्सिजन लेवल ऐंशीच्या खाली आल्याने त्यांना श्वास घेणेदेखील मुश्कील झाले होते. एकीकडे पेशंटची गंभीर स्थिती, तर दुसरीकडे बार्शी येथे व्हेंटिलेटरचा बेड मिळणे कठीण झाले होते. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेऊनही बेड मिळेना. रुग्णाची परिस्थिती खालावत चालल्याने नातेवाइकही बैचेन झाले. शेवटी त्यातील एकाने बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांच्याशी संपर्क साधला. सोपल यांनी शहाजी सुतार यांची क्रिटिकल स्थिती पाहून रात्री एक वाजता रुग्णाच्या नातेवाईकांना कॉल करून नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी येथे बेड उपलब्ध करून दिला. 

सोपल यांनी वेळीच सतर्कता दाखविल्यामुळे सुतार यांच्यावर बायपॅप व्हेंटिलेटरवर उपचार सुरू झाले. शुगर आणि श्वसनाचा त्रास असूनही अवघ्या पंधरा दिवसांत डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचाराला प्रतिसाद देत सुतार यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. सुतार कामात पारंगत असलेल्या शहाजी यांनी आपल्या अंगी असलेल्या कलेच्याद्वारे पंचक्रोशीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे अशा दहा जणांचे मायेचं छत्र असणाऱ्या शहाजी सुतार यांची मृत्यूच्या दाढेतून सुटका झाल्याने कुटुंबातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, व्हेंटीलेटर बेड तातडीने उपलब्ध करून दिल्याबद्दल कुटुंबीयांनी सोपल यांचे आभार मानले. 

शहाजी सुतार म्हणाले, योग्यवेळी मिळालेले उपचार, कुटुंबीयांची मिळालेली साथ, मनाची दृढता व भगवंताचा आशीर्वाद यामुळे मी कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतलो. यासाठी माजी आमदार दिलीप सोपल, संतनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक काशीद, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल यांची मोलाची मदत मिळाली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com