बिहारला तातडीने मदत देता; मग महाराष्ट्रालाचा सापत्न वागणूक का? : शेट्टींचा केंद्राला सवाल 

मी सत्तेत आहे किंवा नाही याच्याशी काहीही देणेघेणे नाही. वस्तुस्थिती मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे.
Raju Shetty criticizes the central government for delaying help to Maharashtra
Raju Shetty criticizes the central government for delaying help to Maharashtra

मंगळवेढा : बिहारमध्ये पूर आल्यावर केंद्र सरकारने तातडीने मदत केली. पण, महाराष्ट्रात अतिवृष्टीने अतोनात नुकसान होऊनदेखील अद्याप मदत जाहीर केली नाही. महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी विचारला आहे. 

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीचा सांगली जिल्ह्याचा दौरा करून पंढरपूर येथे जात असताना मंगळवेढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. 

या वेळी शेट्टी म्हणाले की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी व जनावरे वाहून गेली आहेत. द्राक्ष व डाळिंब बागांसह इतर फळ व धान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी पंचनामे व इतर गोष्टी बाजूला ठेवून हेक्‍टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने दिली पाहिजे. याशिवाय ओला दुष्काळ जाहीर करून राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने मदत करण्याची आवश्‍यकता आहे. 

याशिवाय, शेतकऱ्यांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. पर्यावरणाशी छेडछाड केल्याची शिक्षादेखील शेतकऱ्यांना भोगावी लागते, असे शेट्टी यांनी नमूद केले. 

पंतप्रधान जगभर फिरत असतात, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला जागतिक व्यासपीठावर मांडले पाहिजे, अशी भूमिका मांडून शेट्टी म्हणाले की, मी सत्तेत आहे किंवा नाही याच्याशी काहीही देणेघेणे नाही. वस्तुस्थिती मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. शेवटी सरकार कोणाचेही असो, शेतकऱ्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. 

ऍड सुजित कदम यांच्या हस्ते शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष ऍड. राहुल घुले, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष हर्षद डोरले, रोहित भोसले, आबा खांडेकर, संतोष बिराजदार, शंकर संघशेट्टी, रणजित बागल आदी उपस्थित होते. 


हेही वाचा : पंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार 


कोल्हापूर : अतिवृष्टी, वादळी वारे व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्‍यातील शेतीक्षेत्राचे पंचनामे ग्रामसेवक आणि तलाठी यांनी करावेत. पंचनाम्यात कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी. पंचनाम्यातून शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. याबाबतचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी काढावेत, अशी सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. 

शेतकऱ्यांनीही गट विकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी पंचनाम्याबाबत संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पालकमंत्री पाटील यांनी चंदगड तालुक्‍यातील दुंडगे, कुदनूर, काळकुंद्री, हुदळेवाडी, किणी, कोवाड आणि निट्टूर या गावातील अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. 
 
Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com