राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुलगा व भावाविरोधातील याचिका निकाली 

मोहोळमधील माने विरोधकांना त्यांच्या कुटुंबीयांची खड्डानखडा माहिती पुरवली जात असल्याची चर्चा आहे.
MLA Yashwant Mane's son and brother's petition for caste verification certificate was disposed
MLA Yashwant Mane's son and brother's petition for caste verification certificate was disposed

वालचंदनगर (जि. पुणे) : मोहोळचे (जि. सोलापूर) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार यशवंत माने यांचे चिरंजीव तेजस माने व बंधू सोपान माने यांच्या विरोधात दाखल केलेली जात पडताळणी प्रमाणपत्राबाबतची याचिका बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने निकाली काढली. त्यामुळे माने कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. 

इंदापूर तालुक्‍यातील शेळगावचे रहिवासी असलेले यशवंत माने यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी मिळविला आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांचा पराभव केला. माने सोलापूर जिल्ह्यातून आमदार झाल्याचे इंदापुरातील त्यांच्या विरोधकांना पचनी पडले नसावे, त्यामुळे त्यांनी मोहोळमधील माने विरोधकांना त्यांच्या कुटुंबीयांची खड्डानखडा माहिती पुरवली जात असल्याची चर्चा आहे. 

यशवंत माने यांनी निवडणुकीच्या वेळी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केलेले आहे. सुरुवातीला आमदार माने यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे करण्यात आली होती. ती फेटाळून लावण्यात आली. 
नागनाथ क्षीरसागर यांचे पुत्र सोमेश यांनी दाखल केलेली याचिका या वेळी समितीने निकाली काढली. मात्र, सोमेश क्षीरसागर यांनी पुन्हा यशवंत माने यांचे चिरंजीव तेजस माने व बंधू सोपान माने यांच्या जातीच्या प्रमाणापत्रावर 19 नोंव्हेबर 2020 मध्ये दुसरी याचिका दाखल केली. 

सोपान माने यांनी अनुसूचित जातीचे नसतानाही फसवणूक करुन अनुसूचित जाती संवर्गासाठी आरक्षित असलेल्या प्रवर्गातून पेट्रोलपंप मिळविला आहे. तसेच, यशवंत माने यांचा मुलगा तेजस यांनी फायदा घेतला असून त्याच्यामुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यावर अन्याय होत असल्याने जात प्रमाणपत्र रद्द करण्याचे मागणी करण्यात आली होती. मात्र, समितीने 11 जानेवारी रोजी दोन्ही याचिकांवर सुनावणी करताना पुनर्निर्णयाचा अधिकार नससल्याचे सांगत सोमेश क्षीरसागर यांची याचिका निकाली काढली. 

अनुसूचितच्या यादीत कैकाडी जातीचा उल्लेख 

राज्य सरकारच्या अनुसूचित जातीच्या प्रचलित यादीत कैकाडी ही जात अनुक्रमांक 28 वर नमूद आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जिल्ह्यात अनुसुचित जातीच्या यादीत समाविष्ठ असल्याने यशवंत माने व त्यांच्या कुटुंबींयाचे जात प्रमाणपत्र वैध मानले जात आहे. 

उच्च न्यायालयात दाद मागणार : क्षीरसागर 

या संदर्भात तक्रारदार सोमेश क्षीरसागर म्हणाले, "आमदार यशवंत माने व कुटुंबातील सदस्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागणार आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com