MLA Sunil Shelke criticizes MLA Gopichand Padalkar
MLA Sunil Shelke criticizes MLA Gopichand Padalkar

पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांचा सुनील शेळकेंनी घेतला समाचार

भारतीय जनता पक्ष सध्याच्या काळात तो विचारांचा पक्ष राहिलेला नाही.

मंगळवेढा : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार पुणे जिल्ह्यातील मावळचे आमदार सुनील शेळके यांनी घेतला. आमदार गोपीचंद पडळकर यांना ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील मकरंद अनासपुरे यांची उपमा देत त्यांच्यावर सडकून टीका आहे. त्यामुळे पंढरपूर विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांची दंगल सुरू झाली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी प्रचारादरम्यान केलेल्या टिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रचारासाठी त्यांना पराभूत केलेले मावळचे आमदार सुनील शेळके यांना मैदानात उतरवले आहे.

कचरेवाडी येथील सभेत बोलताना आमदार शेळके म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा पूर्वी विचाराचा पक्ष होता. मीही त्या पक्षाचा कार्यकर्ता होतो; परंतु सध्याच्या काळात तो विचारांचा पक्ष राहिलेला नाही. पैसेवाला आणि कलाकार असला का त्याला लगेच पक्षात प्रवेश दिला जातो, त्यामुळे अशा कलाकार मंडळीकडून आरोप केले जातात. 

(स्व.) आमदार भारत भालके यांची मतदाराच्यांसाठी प्रश्न सोडविण्याची तळमळ होती. विशेषतः विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु करणे आणि मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लावणे, हे आपले शेवटचे काम असून आपली शेवटची आमदारकी असल्याचे आपणास सांगितले होते. आज त्यांच्या जाण्याने मतदारसंघ पोरका झाला असला तरी मतदारसंघात असलेल्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवार न देता पाठिंबा देणे अपेक्षित होते. परंतु उमेदवार उभा करणे म्हणजे टाळूवरचे लोणी खाल्ल्यासारखा प्रकार भाजपने केला आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केला

आमदार पडळकर यांनी बोलताना समोरच्या व्यक्तीची राजकीय कारकीर्द व त्यांनी मतदारसंघात केलेले काम हे विचारात घ्यावे. आपल्याला विधान परिषद दिली म्हणजे फार मोठी संधी दिल्यासारखे समोरच्याला वाटेल तसे बोलण्याचे धाडस करू नये. ते जसे धनगर समाजाचे नेते आहेत, त्याप्रमाणे सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे व महादेव जानकर हे देखील त्या समाजाचे नेते आहेत. परंतु या दोघांनी बोलताना आपली पातळी सोडली नाही, अशा शब्दांत आमदार शेळके यांनी गोपीचंद पडळकर यांना सनावले. 

कोरोनाच्या संकटात दोन्ही पक्षाने प्रतिष्ठेची केलेल्या लढतीत जनतेचा कौल घेण्यासाठी नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जात आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे मतदाराची मात्र करमणूक होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com