महेश कोठेंना प्रवेश नाही; पण आमदारकीसाठी राष्ट्रवादीकडून मतदारसंघ मिळाला? 

देशमुख आणि आमदार संजय शिंदे यांची मैत्री सर्वश्रुत असल्याने त्यांची भूमिका काय राहणार, याकडेही लक्ष राहणार आहे.
Mahesh Kothe has no entry into the NCP; But got a constituency for MLA?
Mahesh Kothe has no entry into the NCP; But got a constituency for MLA?

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी मोठ्या तयारीनिशी मुंबईत गेलेले महेश कोठे यांच्या पदरी शिवसेनेमुळे पुन्हा निराशा पडली आहे. मात्र, ज्या आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगून कोठे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा आहे. त्यामुळेच कोठे यांनी सोलापुरातील शहर उत्तर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. 

सोलापूर शहरात कोठे घराण्याचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. विशेषत: शहर मध्य व शहर उत्तर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात कोठे यांना मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोठे यांच्यामुळे महापालिकेवर सातत्याने कॉंग्रेसचीच सत्ता राहिली आहे. शहर उत्तर मतदारसंघातून 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून लढताना कोठे यांनी 52 हजारांहून अधिक मते मिळविली होती. ही मते विजयी उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्यानंतरची होती. 

त्यावेळी त्यांना (स्व.) शिवाजी पिसे, नगरसेवक चेतन नरोटे यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी मदत केली होती. मात्र, राष्ट्रवादीकडून मनोहर सपाटे यांनी निवडणूक लढविल्याने मताचे विभाजन होऊन भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख विजयी झाले होते. 

सोलापूर शहरातील जागावाटपात शहर मध्य हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे, तर शहर उत्तर हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे महापलिकेतील सर्व पदे भूषविल्यानंतर आमदारकीच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी कोठे यांच्याकडे शहर उत्तरशिवाय पर्याय नव्हता. त्यातून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. 


आता शिवसेनेत असलेले महापलिकेतील विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांचीही त्यांना आगामी निवडणुकीत मदत होण्याची शक्‍यता आहे. कारण, पालिका निवडणुकीपासून त्यांचे कोठे यांच्याशी सख्य राहिलेले आहे. शिवाय त्यांचा प्रभागही शहर उत्तर या मतदारसंघात येतो. 


दिग्गजांची समजूत काढावी लागणार 

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीच्या दिग्गज नेतेमंडळींचा भरणा आहे. यात माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, प्रवीण डोंगरे, पद्माकर काळे, परिवहनचे माजी सभापती राजन जाधव, महेश गादेकर आदींचा समावेश आहे. यांच्या नाराजीचा सामना कोठे यांना या मतदारसंघात करावा लागू शकतो. मात्र, ते या सर्व नेतेमंडळींची समजूत कशा प्रकारे काढतात, हे पाहवे लागेल. 

देशमुख-शिंदेंची मैत्री 

शहर उत्तर या मतदारसंघात कोठे यांना भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांचा सामना करावा लागणार आहे. देशमुख आणि आमदार संजय शिंदे यांची मैत्री सर्वश्रुत असल्याने त्यांची भूमिका काय राहणार, याकडेही लक्ष राहणार आहे. 

बरडे-शिंदे भेट 

विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची शिवेसनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी भेट घेतली होती. आता कोठे यांनी शिवसेना सोडल्यानंतरही त्यांनी शिंदे यांची भेट घेतली. शिवसेनेतील नेत्यांमुळेच मला 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळू शकली नाही. त्यांच्यामुळेच मला पक्षाविरोधात बंडखोरी करावी लागली, असा आरोप कोठे यांनी केल्याची चर्चा आहे. दरम्यान, कोठे यांची पक्षातून हाकलपट्टी केल्याचे बरडे यांनी त्याचवेळी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com