मी पंढरपुरात रोखतो, तुम्ही मंगळवेढ्यातून लीड द्या; आवताडे कसे आमदार होत नाहीत, तेच बघू - BJP MLA Prashant Paricharak's open challenge to NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

मी पंढरपुरात रोखतो, तुम्ही मंगळवेढ्यातून लीड द्या; आवताडे कसे आमदार होत नाहीत, तेच बघू

हुकूम मुलाणी
मंगळवार, 13 एप्रिल 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार थेट धमकी देऊन गेले आहेत.

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मी पंढरपुरात रोखतो, तुम्ही मंगळवेढ्यातून लीड द्या. मी आणि समाधान आवताडे यांनी अनेक बेरोजगारांना रोजगार दिला, त्यांनी 11 वर्षात काय केले? ही निवडणूक विचाराची आहे. भावनेची नाही. मी नाही तर माझ्या विचाराचा समाधान आवताडे आमदार झाला पाहिजे; म्हणून माझा प्रयत्न आहे. पंढरपूर मी सांभाळतो, तुम्ही मंगळवेढ्यातून मतदान द्या, समाधान आवताडे कसे आमदार होत नाहीत, हे बघूच, असे आव्हान आमदार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. 

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ पंढरपूरमध्ये आयोजित सभेत परिचारक बोलत होते. परिचारक यांनी आपल्या भाषणातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. 

आमदार परिचारक म्हणाले की, मागील अकरा वर्षात विरोधकांनी तुम्हाला पाणी तर दिलेच नाही. फक्त सर्वे करण्याचे काम केले. पण, निधीची तरतूद केली नाही. आमच्या उमेदवारांस निवडून द्या; अन्यथा निधी मिळणार नाही, अशी थेट धमकी उपमुख्यमंत्री अजित पवार देऊन गेले आहेत. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी देताना कधीही राजकारण केले नाही. मी आणि समाधान आवताडे यांनी अनेक बेरोजगारांना रोजगार दिला आहे, त्यांनी 11 वर्षात काय दिले आहे? ग्रामीण भागात जिथे टाकी आहे, तिथे पाईप नाहीत आणि जिथे पाईप आहेत, तिथे टाकी नाही, अशी वाईट परिस्थिती आहे. ही निवडणूक विचाराची आहे, भावनेची नाही. हे लक्ष असू द्या. 

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष हे 60 चा आकडाही पार करू शकले नाहीत, त्यांच्या जुगाडासाठी ते एकत्र आले आहेत. मी वीस वर्षे त्यांच्याबरोबर (राष्ट्रवादी काँग्रेस) राहिले आहे, त्यांचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत, हे मला माहिती आहे. 

आपण आज विजयी उमेदवारासाठी येथे जमलो आहोत. जनतेला लुटणाऱ्या लुटारूंनाच्या विरोधात, आया बहिणींची अब्रू लुटणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकाराच्या विरुद्ध ही निवडणूक आहे. सरकार मायबाप असल्याचे सांगितले जाते. मात्र, हे कसले मायबाप सरकार, हे तर लुटारूचे सरकार आहे. या राज्य सरकारच्या काळात महिला अत्याचार वाढले. या सरकारच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो. आज जनता हवालदिल आहे, त्यांना दिलासा देण्याचे काम हे सरकार करू शकलेले नाही, असेही वाघ यांनी नमूद केले.

बार आणि रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर कोरोना वाढत नाही; परंतु मंदिरात गेल्यावर कोरोना वाढतो, हा जावईशोध या सरकारने लावला आहे. सत्तेची ऊब आलेले, माजखोर हे सरकार असून त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढ्याच्या विकासासाठी समाधान आवताडे हा दमदार आवाज सभागृहात पाठवा, असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख