आमचं एवढं काम करून द्या; म्हणून मीही प्रीतम मुंडेंकडे अर्ज घेऊन जाते 

परळीच्या लोकांनी मला 92 हजार मते देऊन पाडलं आहे. त्यामुळे परळीच्या जनतेला मी दूषणे देत नाही. ''
Pritam Munde is currently in power; I am out of power: Pankaja Munde
Pritam Munde is currently in power; I am out of power: Pankaja Munde

औरंगाबाद : "खासदार प्रीतम मुंडे सध्या सत्ताधारी आहेत. मी सत्तेच्या बाहेर आहे. त्या आता केंद्रात सत्तेत आहेत, त्यामुळे आमचं एवढं काम करून द्या; म्हणून मीपण कधीतरी एखादा अर्ज घेऊन त्यांच्याकडे जाते,'' असे भारतीय जनता पक्षाच्या सचिव पंकजा मुंडे या मिश्‍किलीने म्हणाल्या. त्यावर ""प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी मला अर्ज देण्याची आवश्‍यकता नाही, त्या मला आदेश करू शकतात,'' असे हजरजबाबी उत्तर खासदार प्रीतम मुंडे यांनी दिले. 

पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्या वेळी या दोघी बहिणींमधील मिश्‍किल संवाद व त्यावरील उत्तर ऐकायला मिळाले. 

"आम्ही कायम सत्तेच्या बाहेरच राहिलेलो आहोत. सत्तेत आम्ही कधी होतो. संघर्ष करणे हा आमचा मूलमंत्र आहे. (स्व.) गोपीनाथ मुंडे फक्त एकदाच सत्तेत होते. त्यामुळे आम्ही कायम सत्तेच्या बाहेर आहोत. समाजासाठी आम्ही दोघी कायम कष्ट करत आहोत,'' असे "आपण दोघी सध्या काय करत आहात,' या प्रश्‍नाला पंकजा यांनी उत्तर दिले. 

त्या पुढे म्हणाल्या की, "आता लोक निधी मागत नाही, बदल्यांची कामे सांगत नाहीत, तर ते आता प्रश्‍न येऊन सांगतात. परळीच्या जनतेने तुम्हाला पाडलं, असे बाहेरचं लोक म्हणतात. पण, मी त्यांना सांगत असते, परळीच्या लोकांनी मला 92 हजार मते देऊन पाडलं आहे. त्यामुळे परळीच्या जनतेला मी दूषणे देत नाही. '' 

"मंत्रिपदाचा भार नाही, त्यामुळे लोकांना माहीत आहे की पंकजाताईंना वेळ आहे, त्यामुळे लोक पूर्वीप्रमाणेच भेटायला येत असतात,'' असे प्रीतम मुंडे म्हणाले. त्याचवेळी पंकजा यांनी प्रीतम यांच्याकडे बोट दाखवत वरील मिश्‍किल टिप्पणी केली होती. 

"पंकजा मुंडे या राष्ट्रीय सचिव असल्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी आहे. दौरे असतात. तसेच, मी दिल्लीत असते, त्यामुळे प्रत्यक्ष एकमेकींना भेटण्याचा प्रसंग कमी येतो. आमची भेटही लवकर होत नाहीत,'' असे खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितले. 

गोपीनाथ मुंडे यांची जागा भरून काढण्यासाठी ओबीसी नेत्यांमध्ये स्पर्धा आहे का? याबाबत पंकजा म्हणाल्या, "ओबीसी म्हणजे गोपीनाथ मुंडे असे म्हणण्यापेक्षा वंचित म्हणजे गोपीनाथ मुंडे हे अधिक बरोबर आहे, असे मला वाटतं. कारण गोपीनाथ मुंडे कायम वंचितांच्या मागे कायम पाठीशी राहिले आहेत. आज ओबीसी वंचित आहे आणि मागण्या हा ओबीसींचा न्यायहक्क आहे.'' 

जालन्यात झालेल्या मेळाव्यात नेत्यांमध्ये नेतृत्वाची स्पर्धा जाणवत होती. यावर त्यांनी सांगितले की, "त्याकडे मी वेगळ्या दृष्टीने पाहते. मेळाव्यात प्रत्येक पक्षाचा नेता गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख करत असेल तर ते माझे भाग्य आहे. प्रत्येकाने त्या विचाराची जागा भरून काढावी. माझा जेवढा हक्क मुंडेंवर आहे, तेवढाच हक्क वड्डेटीवार व इतर नेते दाखवत असतील, तर मला त्याचे कौतुक आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com