रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे एकनाथ शिंदेंचा चढला पारा

ठाणे शहरात चार हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (ता. 8) पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली.
Eknath Shinde Got Annoyed due to Increasing Corona Patients
Eknath Shinde Got Annoyed due to Increasing Corona Patients

ठाणे  : ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. प्रशासनाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. प्रशासन हा वाढता आकडा कमी करण्यात कमी पडत असल्याने पालमकंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही साखळी कशी तोडता येईल यासाठी प्रयत्न करा, हायरिस्क आणि कोरोनाबाधीत रुग्णांना तात्काळ उपचार द्या, अशी तंबी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

ठाणे शहरात चार हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (ता. 8) पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

एखाद्या भागात रुग्ण आढळल्यानंतर त्या भागाचे तातडीने सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. परंतु, तसा सर्व्हे होताना दिसत नाही, ही गंभीर बाब आहे, असे सांगत एकूणच कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तोडण्यात प्रशासन असफल ठरत असल्याचा ठपकाही त्यांनी यावेळी ठेवला. दरम्यान या बैठकीनंतर आयुक्त विजय सिंघल यांनीही अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची कानउघाडणी केल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com