जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी महिला आरक्षण जाहीर  - Zilla Parishad Panchayat Samiti announces women reservation | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी महिला आरक्षण जाहीर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मार्च 2021

जिल्हा परिषदेच्या १४ जागा आणि त्या अंतर्गत जिल्ह्यातील सात पंचायत समितीच्या २८ जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत.

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गच्या (ओबीसी) रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या १४ जागा आणि त्या अंतर्गत जिल्ह्यातील सात पंचायत समितीच्या २८ जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी काढण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांचे आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आणि पंचायत समित्यांच्या रिक्त जागांची सोडत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयात काढण्यात आली आहे. 

यामध्ये जिल्हा परिषदेचे विद्यमान शिक्षण व बांधकाम समिती सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांना या आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यांच्या कानशिवणी जिल्हा परिषद सर्कल मध्ये सर्वसाधारण महिला हा प्रवर्ग निघाल्याने त्यांची चांगलीच गोची झाली आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद व त्या अंतर्गत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत देण्यात आलेल्या प्रवर्ग निहाय आरक्षण ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाल्याने, या निवडणुकीत निवडून आलेल्या नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गातील सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने चार मार्च रोजी दिला होता. त्यानुसार जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १४ सदस्यांचे आणि सात पंचायत समित्यांच्या २८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार रिक्त झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जागा सर्व साधन प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत, त्यासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी काढण्यात आली आहे.

अशी झाली आरक्षण सोडत
जिल्हा परिषद : सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग - तळेगाव, कुटासा, दगडपारवा, बपोरी, अडगाव बु., अंदुरा, कानशिवणी.

हेही वाचा : चुकीची माहिती देऊन शरद पवारांनी दिशाभूल केली...फडणवीसांचा दावा
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावले आहेत. पवारांनी देशमुख यांना क्लिनचीट दिली. शरद पवार यांचे दावे फेटाळून लावण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले आहे. फडणीस आज सांयकाळी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांकडे याबाबतचे पुरावे सादर करून या प्रकरणाची सीबीआयची चैाकशीची मागणी करणार आहेत फडणवीस म्हणाले की, शरद पवार साहेबांना चुकीची माहिती देण्यात आली. अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलणे अपेक्षीत आहे, पण ते एक शब्दही बोलत नाहीत. या प्रकरणाची चुकीची माहिती पवार साहेबांना देऊन त्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. पवारांना योग्य ती माहिती दिली गेली नसल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख