भाजप ओबीसी मोर्चा; पंकजा मुंडेंना निमंत्रण देण्याचे टिळेकर विसरले... 

पक्षाने मला २६ जूनला झालेल्या चक्का जाम आंदोलनाची जबाबदारी दिली होती.
  Pankaja Munde .jpg
Pankaja Munde .jpg

मुंबई : भाजप (BJP) ओबीसी (OBC) मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक १९ जुलैला मुंबईमध्ये पार पडली. मात्र, या बैठकीला भाजप नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अनुपस्थित होते. या बैठकीला पंकजा मुंडे का अनुपस्थित होत्या त्यावर पंकजा यांनी खुलासा केला आहे. त्या बैठकीची कल्पनाच आम्हाला नव्हती असे त्यांनी सांगितले. (Yogesh Tillekar forgot to invite Pankaja Munde to the OBC Morcha meeting) 

पंकजा मुंडे म्हणाल्या ''कदाचित आमच्यावर रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी असेल म्हणूनच असे झाले असावे. आम्हाला त्या बैठकीची कल्पना नव्हती. मात्र, पक्षाच्या सगळ्या सेलच्या स्वतंत्र बैठका होत असतात, त्यात सगळ्यांना बोलावले जात नाही, असे त्या म्हणाल्या.

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तुम्ही सक्रीय असताना बोलावले नाही. याचे कारण काय असेल असा प्रश्न विचारला असात त्या म्हणाल्या ''मी ते कसे सांगू शकणार? मोर्चाच्या अध्यक्षांनाच विचारा. बोलणाऱ्या नेत्याचे लोक ऐकतात तेव्हाच आंदोलन यशस्वी होते. पक्षाने मला २६ जूनला झालेल्या चक्का जाम आंदोलनाची जबाबदारी दिली होती. मी रस्त्यावर उतरले, ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली, सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. आम्ही रस्त्यावर उतरुन यापुढेही आंदोलने यशस्वी करू शकतो. हे पक्षाला माहीत असल्याने बोलावले नसेल. असे त्या म्हणाल्या.   

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात भाजपने गेल्या महिन्यात पुकारलेल्या आंदोलनात पंकजा सहभागी झाल्या होत्या. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले होते. भाजपसाठी १९ जुलैला झालेली कार्यकारिणी महत्वाची होती. तरीही पंकजा यांनी पाठ फिरविल्याने त्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात रंगली होती. बैठकीला ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व केलेले आणि भाजपचे महत्त्वाचे ओबीसी नेतेच अनुपस्थित असल्याचे त्यांची चर्चा राज्यभर रंगली होती. 

मुंबई येथे आयोजित भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, खासदार संगम लाल गुप्ता, आमदार डॉ. संजय कुटे, अतुल भातखळकर, टिळेकर उपस्थित होते. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com